DHULE : पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे, पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणे हा गुन्हा नाही- अनिल गोटे

 DHULE : पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे, पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणे हा गुन्हा नाही- अनिल गोटे



धुळे ( प्रतिनिधी ) - पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणे हा गुन्हा नाही' अशा शब्दात माजी आमदार अनिल गोटे यांनी मतदारांना आलेली संधी घालवू नका, असे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. यासंदर्भात लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे व लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे, की 'पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे, पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान न करणे हा गुन्हा नाही' त्यामुळे तुम्ही काही चुकीचे करीत आहात वगैरे विसरून जा, घाबरू नका आपण तुमच्या बरोबर आहोत. कारण अशी संधी पुन्हा येणे नाही. याचा विसर पडू देवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काही चुकीचे करीत नाही. भ्रष्टाचाऱ्यांचा पैसा चलनात आणणे म्हणजे सरकारला मदत करणे होय. तेव्हा लक्ष्मी आली घरा तर, परत कशाला करा? निवडणुकीतील मतदाना इतकेच हे पवित्र काम आहे असेही पत्रकात अनिल गोटे यांनी म्हटले आहे. जो पर्यंत तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना हिसका दाखवत नाही. 'त्यांचेच गहू आणि त्यांनाच जेव' अशी सुस्पष्ट भुमिका घेत नाही. तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत बदल होऊच शकत नाही. यांनी दहा टक्के, पंधरा टक्के अशा असंख्य मार्गांनी अक्षरशः डोळे दिपतील एवढा पैसा गोळा केला आहे. राजकारण हा त्यांचा धंदा झाला आहे. राजकारणातून पैसा ! पैशातून राजकारण अस यांच्या गणिताचे चक जो पर्यंत तुम्ही मोडून काढत नाही. तोपर्यंत तुम्हाला काही किंमत नाही. म्हणून माझा सल्ला ऐका 'लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. ही आयती आलेली संधी सोडू नका! लक्षात घ्या, 'लक्ष्मी आली घरा तर, परत कशाला करा'? असा अभिनव सल्ला अनिल गोटेंनी दिला आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.