SANGLI | शिराळ्याच्या साई सिमरनने पटकावले राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, सर्वसाधारण कौशल्यासाठी मिळाले राष्ट्रपतींचे सुवर्णपदक

 SANGLI | शिराळ्याच्या साई सिमरनने पटकावले राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, सर्वसाधारण कौशल्यासाठी मिळाले राष्ट्रपतींचे सुवर्णपदक



  सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील साईसिमरन हिदायद घाशी या मुलीला  सर्वसाधारण कौशल्यासाठी   राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे सुवर्णपदक मिळवणारी साई सिमरन ही सांगली जिल्ह्यातील पहिला महिला आहे. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईच्या मार्गदर्शनाखली साई सिमरन हिने जिद्दीने आणि मेहातीने आपले काम सुरू ठेवले. यामध्ये सामाजिक क्षेत्राबरोबर तिने एनसिसी, एन एस एस यासह अनेक विविध क्षेत्रात आपल्या कामाची छबी निर्माण केली. विविध क्षेत्रात कामा करणाऱ्या अशा गुणवंतांना राष्ट्रपतींकडून विशेष पदक देऊन सन्मानित केले जाते. यासाठी साई सिमरन हिने सप्टेंबर महिन्यात आपल्या कार्याची फाईल पाठवली होती.. याची छाननी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीनंतर साई सिमरन ही राष्ट्रपती पदकाची मानकरी ठरली. नुकत्याच शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभारंभावेळी कुलगुरूंच्या हस्ते साई सिमरन घाशी हिला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. एका सर्वसामान्य घरातील मुलीने आपल्या आईला आपले गुरू मानत केलेली मेहनत आणि काम यामुळेच ती राष्ट्रपती पदकाची मानकरी ठरू शकली. त्याबद्दल साई सिमरन हीचे सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. उच्च शिक्षित असणाऱ्या साई सिमरन हिला आता जनसंपर्क सेवेत काम करण्याची इच्छा असून त्या दृष्टीने तिने मास्क कम्युनिकेशन, जर्नालिझम क्षेत्रात आपली शिक्षण सुरू केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.