आदिवासी कातकरी मुला- मुलींची अनुदानित आश्रम शाळा बाबरे येथे शालेय क्रीडा महोत्सव संपन्न

 आदिवासी कातकरी मुला- मुलींची अनुदानित आश्रम शाळा बाबरे येथे शालेय क्रीडा महोत्सव  संपन्न



( प्रतिनिधी शहापूर / ठाणे) 


      ए बी एम समाज प्रबोधन संस्था संचलित आदिवासी कातकरी मुला- मुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरे,ता. शहापूर, जि. ठाणे, येथे शालेय क्रीडा महोत्सव  मोठ्या आनंदात  उत्साहात  नुकताच संपन्न झाला.   

       या कार्यक्रमाचे उदघाटन किनव्हली  पोलीस स्टेशनचे पी. स.आय. संजय सुरळकर  यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला किन्हवली पोलीस स्टेशनचे  मेजर पारधी  तसेच संस्थेच्या संचालिका शितल गायकवाड  , शाळेच्या माध्यमिक चेअरमन पुनम भडांगे ,  कार्यकारी चेअरमन संतोष पडवळ, पोलीस   जिल्हास्तरीय महिला दक्षता कमिटीच्या तथा  आश्रम शाळेच्या  माध्यमिक मुख्याध्यापिका आशा नवनाथ  रणखांबे , प्राथमिक मुख्याध्यापक कपिल सातपुते तसेच  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

          क्रीडा प्रमुख- संदीप भालके आणि विवेक पष्टे यांनी या महोत्सवाचे  कृतिशील माध्यमिक मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे यांच्या सर्व सुचनांनुसार  आणि मार्गदर्शनाने नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. इ . 1 ली ते इ .10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रित्या प्रत्येक सामन्यात भाग घेतला.  या महोत्सवाचे सूत्रसंचालन कविता खारीक  यांनी केले. तसेच  शालेय क्रीडा मोहत्सवात  पंच म्हणून कामकाज - हितेश पाटील  सचिन उगले, भीमराव राऊत, संदीप पडवळ, शीतल सूर्यवंशी, जयश्री खंडवी, मयुरी घायवट,  यांनी  पाहिले तर  स्कोअरर  म्हणून कामकाज   योगिता जाधव यांनी   केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.