विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांचा दोन दिवसीय इज्तेमा दुवा ने संपन्न
--------------------------------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
देशात 'अमन', 'भाईचारा' कायम असावा, सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावे, संपूर्ण मानव जातीचे कल्याण व्हावे, बळीराजाला कर्जमुक्ती मिळावी, अशा शब्दांत सोमवारी आष्टी येथील काली मज्जिद कब्रस्तान येथे दोन दिवसीय इज्तेमामध्ये विशेष प्रार्थना 'दुआ'करण्यात आली.आष्टी शहर परिसरातील काली मस्जिद परीसरात हा तब्लिग जमात चा इस्तेमा (संम्मेलन) 26 व 27 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या वेळीं साधारण 10 ते 15 हजार पेक्षा जास्त समुदाय उपस्थित होता. यावेळी हजरत मुफ्ती असलम साहब यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित समुदायाने 'आमीन' म्हणून संबोधन दिले. विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांचा दोन दिवसीय इज्तेमा दुवा ने संपन्न झाला. यावेळी प्रार्थना करताना उपस्थित सर्व भाविकांनी आपल्या अश्रूंचा बांध मोकळा करून दिला.
यावेळी मुफ्ती असलम यांनी सांगितले की प्रत्येक माणूस हा यशस्वी होण्याच्यासाठी आयुष्यात अनेक खडतर प्रयत्न करून त्या मार्गाने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतो मात्र यशस्वी होण्याचा मार्ग हा योग्य असला पाहिजे अयोग्य मार्गाने यशस्वी झाला तरी त्याचे यश चिरकाल टिकणारे नसते. महिला-मुलींना शिक्षण द्या- असे मुफ्ती असलम सहाब यानी सांगितलें शिक्षित झाल्यास नवीन पिढीवर चांगले संस्कार घडतील.इस्लाम धर्म अमन-शांतीचा 'पैगाम' देतो. अल्लाह आणि
प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला
दाखविलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगावे. जगाचे किंवा 'दीन'चे काम असेल, तर चांगल्या कामासाठी सतत पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत मुफ्ती असलम यांनी या वेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात पवित्र 'कुरआन'ची तालीम करण्याची गरज आहे. जीवन कसे जगावे, याविषयी कुरआनमध्ये उल्लेख आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषाला 'कुरआन'ची तालीम देण्याची आज गरज आहे.
घरातील पुरुष मंडळींना मस्जिद, इज्तेमा, जमाअत तसेच इतर ठिकाणी इस्लामची माहिती मिळत असते. मात्र, महिला आणि विशेषतः मुलींना 'दीन'ची माहिती मिळत नसल्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र 'जमात' काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. घरातील महिला शिक्षित झाल्यावर नवीन पिढीवर चांगले संस्कार घडतील. यासाठी प्रत्येकाने महिला शिक्षणावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
अल्लाह सर्वांना हिदायत (प्रेरणा) देणारा असून, तोच या संपूर्ण जगाचा पालनहार आहे. सर्वांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अंधारमय अज्ञानातून बाहेर काढण्याची गरज आहे. मुस्लिम बांधवांनी सदैव अल्लाहचा 'जिक्र' करीत राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. 'कुरआन'ची तिलावत व शिक्षणामुळे जगातील चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती होते. प्रेषितांनी 'दीन' आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. समाजाला चांगली दिशा दाखविण्यासाठी कुणीही अल्लाहचा दूत येणार नसल्याने प्रेषितांनी दाखविलेल्या 'नेकी'च्या मार्गावरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
इज्तेमाचा समारोप सोमवार (दि. 27) रोजी सायंकाळी मगरीब ची नमाजनंतर शेवटचे बयान नंतर सामुहिक दुआ ने इज्तेमाचा समारोप झाला
दुआ संपल्यावर साथींनी इज्तेमा स्थळापासून कसे निघावे यावरही मार्गदर्शन करण्यात आले. साथींनी निघण्याची अजिबात गडबड करू नये, असे आवाहन करण्यात आले. या इज्तेमास आ.बाळासाहेब आजबे,आ. सुरेश धस ,माजी आ.भिमराव धोंडे,सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनीभेटदिली.' दुआ' झाल्यानंतर इज्तेमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने साथी घराकडे जाण्यासाठी निघाले होते.
stay connected