कडा येथे बौद्ध धम्म परिषदेला उत्फुर्त प्रतिसाद

 *कडा येथे बौद्ध धम्म परिषदेला उत्फुर्त प्रतिसाद*



--------------------------------------

आष्टी/प्रतिनिधी 

भारतीय बौद्ध महासभेच्या आष्टी तालुका शाखेच्या वतीने कडा येथे सहा दिवसीय श्रामणेर शिबिर व एकदिवसीय समता सैनिक दल शिबिरासह १५ गावांत महिला धम्म प्रशिक्षण शिबिर झाले. याचा समारोप २६ नोव्हेंबर रोजी संविधानदिनी कडा येथील प्रविण मंगल कार्यालयात संपन्न झाला.


यावेळी भव्य दिव्य रॅली काढून त्यामध्ये तालुक्यातील मोठ्या प्रमाणात धम्म बांधव व महीला यांच्या उपस्थितीत ही धम्म परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी सुभाष भादवे होते.


यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष भिकाजी कांबळे, सरचिटणीस बी. एच. गायकवाड, भंते बुद्धशरण बोधी, सुशील वाघमारे, जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे, संस्कार उपाध्यक्ष वामन निकाळजे, पदाधिकारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.संभाजी ओव्हाळ यांनी केले तर सूत्रसंचालन आकाश कांबळे यांनी केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.