आष्टी तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी अनुदान द्यावे - अमर वाळके
आष्टी, दि.15 आष्टी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असुन पशुपालक शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रति जनावराला चाऱ्यासाठी अनुदान जाहिर करून थेट पशुपालकांच्या बँकेच्या खात्यावर ती रक्कम द्यावी, अशी मागणी मा. अमर वाळके यांनी केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पञकात त्यांनी म्हटले आहे की, आष्टी तालुक्यात अनेक शेतकरी दुध व्यावसाय करतात त्यामुळे तालुक्यात दुभत्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सद्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असुन नुकताच शासनाने दुष्काळ देखील जाहिर केला आहे. दुष्काळ असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याच बरोबर दुधाचे दर देखील प्रतिलिटर 30 रूपयांच्या खाली आहेत. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळी उपाययोजना करून दुध उत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी अनुदान जाहिर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम द्यावी अशी मागणी मा. अमर वाळके यांनी केली आहे.
stay connected