केज आंबेजोगाई रोड वरती ढाकेफळ जवळ हॉटेल तुळजाई यांचे थाटात उद्घाटन .
केज (प्रतिनिधी) दि १४ रोजी
ढाकेफळ येथील गोरख थोरात व गणेश थोरात या दोन भावांचे हॉटेल तुळजाई यांचे आज दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले.
सदरील माहिती अशी की आंबेजोगाई रोड वरती येडेश्वरी फाटा या ठिकाणी गोरख थोरात व गणेश थोरात या दोन भावंडांनी गेल्या चार ते पाच वर्षापासून आपले छोटे हॉटेल चालू केले होते. त्याचेच आज मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर केले असून आज दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हॉटेल तुळजाई टी हाऊस व रसवंती ग्रह याचे मोठ्या थाटामध्ये उद्घाटन करण्यात आले.
शिक्षण करून कोणत्याही नोकरीच्या मागे न जाता आपला स्वतःचा व्यवसाय उभा करून नवीन तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय केला पाहिजे. प्रत्येक तरुणने आपला नवीन नवीन व्यवसाय सुरू करून आपली प्रगती केली पाहिजे म्हणून आज तीच आंबेजोगाई रोड वरती हॉटेल तुळजाई याचे उद्घाटन करण्यात आले या हॉटेलमध्ये चहा, पोहे ,वडापाव व तसेच येणाऱ्या उन्हाळा कार्यकाळात थंडगार उसाचा रस या ठिकाणी मिळणार आहे. तसेच या हॉटेलमध्ये व्यवस्था चांगली केलेली आहे. येणाऱ्या व्यक्तींच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केली आहे.
stay connected