खालापूरी ग्रामपंचायत मधील सरपंच ,ग्रामसेवक आणि ग्राम सदस्याना आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे जयंतीचा विसर - डॉ जितीन वंजारे
बीड प्रतिनिधी:-१४ नोव्हेंबर हा दिवस म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी भाग्याचा दिवस ठरला कारण याच दिवशी आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म झाला त्यांनी अनेक क्रांतिकारी योद्धे घडवले,क्रांतीचा इतिहास असणाऱ्या वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीचा मात्र विसर खालापूरी येथील ग्रामपंचायत कर्मचारी ,ग्रामसेवक ,सरपंच आणि सदस्यांना पडलेला आहे .१४ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी होन अपेक्षित होत पण एकही सदस्य,सरपंच किंवा ग्रामसेवकाच्या मनातील क्रांतीचा मार्ग उघडला नाही आणि आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी झाली नाही.गावात महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करू त्यांचे विचार रुजवू अस फक्त भाषणात सांगणारे बरेच पदावरील बोलघेवडे नेते आहेत पण प्रत्यक्षात जातीय रंग, जातीयवाद आणि मनुवाद मनात भरलेल्या लोकांकडून आमचे दैवत असलेल्या भारताच्या महान योध्दास जयंती साजरी करून साधा सलामही घातला नाही ही खेदाची बाब आहे .ग्रामपंचायत सर्वधर्म समभाव आणि सर्व महापुरुषांच्या जयंत्या पुकारून का साजऱ्या करत नाहीत .काही विशिष्ट महापुरुषांच्या च जयांत्याच का पुकारून साजऱ्या केल्या जातात हा वैचारिक भेदाभेद ,जातीयता चा भेद नाही काय ? नेते फक्त जातीत वाटायचे काय? फक्त आपल्या समाजाचा नेता म्हणून त्यांचीच जयंती साजरी करायची काय? असा परखड सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा खालापूरी येथील नागरिक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी खालापूरी ग्रामपंचायत मंडळींना केला आहे . म्हणजे जातीच विष यांच्या मनात अजून तसच शिल्लक आहे जे राहून राहून उकळी येत आहे याला आता शमवल पाहिजे आणि त्यासाठी सर्व धर्मातील लोकांनी एकत्र आल पाहिजे वैचारिक क्रांती गावात घडवली पाहिजे असा विचार मा.सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी मांडला .
क्रांतिकारक लहुजी साळवे वस्ताद यांची नुकतीच जयंती पार पडली. 14 नोव्हेंबर १७९४ हा त्यांचा जन्मदिन, 14 नोव्हेंबर रोजी लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर गावच्या नारायण पेठेत असणाऱ्या मांगवाडा येथे झाला . त्यांचे वडील लढवैये होते. त्यामुळे युद्ध कलेची तालीम त्यांना त्यांच्या घरातूनच भेटली त्यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत अनेक लढाया मध्ये सामील होते तसेच त्यांच्या पूर्वजांकडे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती. त्यामुळे लढाईचे प्रशिक्षण त्यांना परंपरेनुसार भेटत गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारामध्ये अठरापगड जातीला प्राधान्य होते याचा आणखी दुसरा पुरावा देण्याची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या वस्ताद लहुजी साळवे यांच्या कुटुंबीयांना त्याकाळी 'राऊत' ही पदवी महाराजांकडून देऊ करण्यात आली होती.त्यामुळे लढवय्या परंपरेतील वस्ताद लहुजी साळवे यांना युद्ध कलेचे बाळकडू त्यांच्याच वडिलांकडून मिळाले त्यांना युद्ध कलेतील दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी,बंदूक चालवणे,निशानेबाजी यासारख्या अनेक युद्ध कला अवगत होत्या.त्यांनी पुढे जहालवादी क्रांतिकारक घडवण्याच्या उद्देशाने आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांनी तालीम चालू केली.आद्य क्रांतिकारक लहुजी राघोजी साळवे यांनी महाराष्ट्रातील तमाम क्रांतिकारी, क्रांतिवीर घडवली यामध्ये मुख्यता बाळ गंगाधर टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके, गोपाळ गणेश आगरकर,चाफेकर बंधू, क्रांतिकारी खरे, क्रांतिकारी नाना दरबारे,रावबहादूर गोवंडे,नाना मोरोजी,क्रांतिकारी मोरो विठ्ठल,क्रांतिकारी नाना छत्रे,महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजबे इत्यादी सह अनेक क्रांतिकारी त्यांनी घडवले. ह्या अश्या महान आद्य क्रांतिकारक व्यक्तीला जयंती निमित्त ग्रामपंचायत नमन करत नसेल तर ही ग्राम पंचायत बरखास्त का करू नये .यावर प्रशासकीय आणि निवडून गेलेले प्रतिनिधी यांच्यावर कार्यवाही का करू नये असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे यांनी केला आहे.तसे रीतसर निवेदन ग्रामसेवक आणि तहसीलदार यांना देवून वेळीच तंबी दिली जाईल नसता कायदेशीर कार्यवाही ला सामोरे जावं लागेल कारण क्रांतिकारकांचे विचार ,महापुरुषांचे विचार,थोर संत महांतचे विचार गावात रुजवण्यासाठी जयंत्या उत्सव साजरे करण्यासाठी विशिष्ट रक्कम जमा केली जाते त्यासाठी शासनाचा निधी वापरला जातो मागेही येथील सरपंचाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साठी निधी दिला नव्हता आणि परिसर स्वच्छ करूनही दिला नव्हता कारण मनुवादी विचार सारणीच्या लोकांचा गावात विळखा पडत चालला आहे .गावातील तरुणांची माथी भडकावली जात आहेत त्यांना वेगळ्या दिशेने घेऊन जाणारी टोळकी निर्माण झाली आहे त्याला वेळीच अवर घालून गावात क्रांतिकारी आणि महापुरूषांची विचार पेरली गेली पाहिजेत त्यामुळे सर्वच महापुरुषांच्या जयंत्या वैचारिक भावनेतून साजऱ्या करा नसता कायदेशीर मार्गाने जनअंदोलन उभ केल जाईल असा इशारा डॉ जितीन वंजारे यांनी दिला.
stay connected