सावरी सातकर हीने मिळवला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजन गटामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक
धानोरा येथील जनता ज्युनियर कॉलेज ची इ . १२ वी ची विद्यार्थीनी कु .पै . सावरी सातकर हीची बारामती येथे दि . ३१ ते २ नोव्हेंबर या वेळेत झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ६२ किलो वजन गटामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला . व राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली . या विद्यार्थीनीला प्रशिक्षक प्रा . राजकुमार गुरसाळी यांनी मार्गदर्शन केले . तिचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दूलभाई , संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल , व्यवस्थापक विशाल बांदल , प्राचार्य सय्यद युनूस , उपप्राचार्य कर्डीले सर , उपमुख्याध्यापक ढोबळे सर , पर्यवेक्षक आयुब सर , व सर्व संस्थेचे कर्मचारी यांनी अभिनंदन केले .
stay connected