शिरूर कासार येथे २.६६ कोटी रू.किमतीच्या दुय्यम निबंधक कार्यालय इमारत बांधकामास मंजुरी आ.सुरेश धस यांचे मागणीने झाले मंजूर

 शिरूर कासार येथे २.६६ कोटी रू.किमतीच्या दुय्यम निबंधक कार्यालय इमारत बांधकामास मंजुरी
 आ.सुरेश धस यांचे मागणीने झाले मंजूर 

***************************



***************************

आष्टी (प्रतिनिधी)

आ.सुरेश धस यांनी ०४ जुलै २०२३ रोजी महसूल मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बीड जिल्ह्यातील पाटोदा आणि शिरूर कासार येथे दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारत बांधकाम मंजुरी मिळावी अशी मागणी केली असता त्यावर सदरील प्रस्ताव तात्काळ मान्य करा असा आदेश दिल्यानंतर ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी महसूल विभागाच्या शासन निर्णयाद्वारे शिरूर कासार येथील दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारत बांधकामास मंजुरी मिळाली आहे.

      शिरूर कासार तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालय इमारतीसाठी आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्यामुळे या नवीन इमारत बांधकामासाठी एकूण ०२ कोटी ६६ लाख २३ हजार रु.किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार या ठिकाणी स्वतंत्र, आधुनिक सोयी सुविधांयुक्त असे दुय्यम निबंधक कार्यालय कार्यान्वित होणार आहे.यामुळे तालुक्यातील नागरिकांची मोठी सोय होणार असून यामुळे शिरूर कासार तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करत आ.सुरेश धस यांचे आभार व्यक्त केले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.