मित्रांच्या मदतीने मुलानेच केला बापाचा खून
उंदरखेल येथील कढाणी तलावातील झुडपात सात महिन्यांपूर्वी (६ एप्रिल) मच्छिमारांना पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला होता. पोलिसांनी वर्षभर तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. तपासाअंती दोन मित्रांच्या मदतीने मुलाने बापाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील आरोपींवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावात मच्छिमारांना ६ एप्रिल रोजी सकाळी बेशरमाच्या झुडपात सांगाडा आढळून आला होता. त्यांनी ही माहिती अंभोरा पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा केला असता ५५ ते ६० वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे आढळून आले. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह अंबाजोगाई येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आता होता. सदर व्यक्तीचा मृत्यू पाण्यात पडल्याने झाला की घातपाताने याचा कसलाचा सुगावा लागत नव्हता. परंतु, अंभोरा ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासात सातत्य ठेवले, नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ या काळात लक्ष्मण सदाशिव शेंडे यांचा खून झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. मुलाने मित्राच्या मदतीने बापाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह उंदरखेल येथील तलावा फेकून दिल्याचे समोर आले. य प्रकरणी पोलिसांनी मुलासह एक मित्राला ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. पोलिस उपनिरीक्षक रवी गुलाब देशमाने यांच्या फिर्यादीवरून रविवारी आरोपी अशोक लक्ष्मण शेंडे (३८ र धानोरा, ता. आष्टी, ह.मु. मिरी माका ता. नेवासा), रामवीर यादव, किरण वाघमारे (दोन्ही रा. धानोरा, ता. आष्टी यांच्यावर अंभोरा पोलिस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके करी आहेत. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे, हवालदा बाबासाहेब गर्जे, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ यांनी केली.
stay connected