*कडा ग्रामपंचायत कार्यालया समोरच वाट द्या वाट आंदोलन*
-------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील कडा येथे ता 20 नोव्हेंबर रोजी कडा येथे वात्सव्यास असणारे अदित्य संतोष मोरे यांनी वाट द्या वाट आंदोलन सुरू केले.या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,कडा येथे राहणारे अदित्य मोरे यांच्या राहत्या घरात ये-जा करण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याच्या आजूबाजूने केलेल्या अतिक्रमनामुळे रस्ता राहीला नसून ती फक्त बोळच राहीली असल्याने ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पुर्विचा हा रस्ता १२ फुट रुंदीचा आहे.परंतू आता तेथे अतिक्रमणे झाल्याने अपुरा आहे.तो रस्ता पुर्वरत करण्यात यावा अशी मागणी आज आंदोलना दरम्यान करण्यात आली आहे.
कड्याचे उपसरपंच बाळासाहेब कर्डीले यांना विचारले असता ते म्हणाले की,आम्ही त्याठिकाणी जाऊन पाहणी करु.
व कोणावरही अन्याय न होता. सर्वांची समजूत घालुन उपोषण कर्ते अदित्य मोरे यांना न्याय मिळवून देवू.व आंदोलन कर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे.
अशी विनंती ही त्यांनी केली आहे.
कडा ग्रामपंचायत ने तीस दिवसात रस्ता करुन देवू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष रहेमान सय्यद यांनी सांगितले.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आष्टी तालुकाध्यक्ष तथा पत्रकार रहेमान सय्यद, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुकाध्यक्ष दिपक भैय्या गरुड समाजिक कार्यकर्ते अशोक जाधव, संतोष मोरे, सलमान सय्यद,विघ्नेश तारू, ओंकार शिरोळे, सुमित जाधव,वसीम पठाण, गुरुनाथ चांगुणे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
stay connected