मुंडे साहेबांनी जनतेला रेल्वे आणण्याचा दिलेला शब्द मी पुर्ण करणार
--------------------------------
माजी आ. भिमराव धोंडे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ आणि कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात खा. प्रीतमताई मुंडेंनी व्यक्त केला विश्वास
आष्टी/ प्रतिनिधी
नगर - बीड - परळी हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्य़ातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रश्न मार्गी लावील अस शब्द स्व. मुंडे साहेब दिला होता. परंतु दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. त्यांनी दिलेला शब्द मी पुर्ण करणार आहे. असा विश्वास खा. प्रीतमताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिला. आष्टी येथिल भगवान महाविद्यालय येथे माजी आ. भीमराव धोंडे यांनी दिवाळी फराळ आणि कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खा. प्रीतमताई मुंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावुन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलतांना खा. मुंडे म्हणाल्या की, सन 2024 पर्यंत नगर - बीड - परळी रेल्वे मार्ग हा बीड पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु राज्यात सरकार बदलेल आणि आघाडीचे सरकार आले. आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात या रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे मध्यंतरी रेल्वेच्या कामाची गती मंदावली होती परंतु सध्या रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. नगर - बीड - परळी या रेल्वे मार्गाचे स्वप्न बीड जिल्ह्यातील जनते पाहिले होते. आणि ते स्वप्न पुर्ण करण्याचा शब्द स्व. मुंडे साहेबांनी दिला होता. मुंडे साहेब आपल्यात नाहीत परंतु त्यांनी जनतेला दिलेला शब्द पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी पुर्ण करील. नगर - बीड - परळी या रेल्वेमार्गावर माझ्याच खासदारकीच्या कार्यकाळात नगर ते आष्टी पर्यंत रेल्वे धावली ही रेल्वे पुढे प्रती पर्यंत जाण्यासाठी मला येणार्या सन 2024 च्या निवडणुकीत साथ द्या असेही आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले. पंकजाताई पालकमंञी असतांना जिल्हाला कोट्यावधी रूपयांचा विकासनिधी वेगवेगळ्या माध्यमातुन मिळुन दिला. त्यामुळे जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील रस्त्यांसह जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यांच बरोबर शेतकऱ्यांना अनुदान आणि पिक विमा देखील मोठ्या प्रमाणात मिळुन देण्याचेपालकमंञी असतांना झाल्याचे खा. प्रीतमताई यांनी यावेळी म्हटले.
यावेळी युवा नेते अजय धोंडे,ॲड वाल्मीक तात्या निकाळजे, अशोक साळवे,आदीनाथ सानप,ॲड साहेबराव म्हस्के,शंकर देशमुख, प्राचार्य हरिदास विधाते, रामदास बडे,बाबुशेट भंडारी, सरपंच माऊली वाघ, अरुण भैय्या निकाळजे,प्रा मुस्ताक पानसरे राजेंद्र धोंडे सह पत्रकार बांधव व आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected