रस्ता कामाचे ठेकेदार कोणीही असो काम दर्जेदारच व्हावे..
-------खा.डॉ.प्रीतम मुंडे
****************************
सुरत ते चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील जनतेसाठी खडकत जवळ एन्ट्री गेट करावे
--- आ.सुरेश धस
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
साबलखेड ते चिंचोली या रस्ता कामाचे आज भूमिपूजन झाले आहे रस्त्याचे कामाचा कालावधी सुमारे वर्षभराचा आहे त्यामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे त्यानंतर या कामाचे लोकार्पण करताना पुरुषांच्या बरोबरीने महिला भगिनींची उपस्थिती असावी यासाठी सर्वांनी संपर्क ठेवावा त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील रेल्वे मार्गावरील भूसंपादनाचा आणि राष्ट्रीय महामार्ग वरील प्रश्नांचा पाठपुरावा करून सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन खा.डॉ.प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी दिले तर अहमद नगर आष्टी बीड हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून त्या दर्जानुसारच या रस्त्याचे काम व्हावे
तसेच सुरत ते चेन्नई या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आष्टी तालुक्यातील जनतेसाठी आष्टी ते खडकत रस्त्यावर एन्ट्री गेट करण्यात यावे अशी मागणी आ.सुरेश धस यांनी केली आष्टी तालुक्यातील साबल खेड ते चिंचोली या रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी खा.प्रीतम मुंडे आणि आ.सुरेश धस हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अजय धोंडे,वाल्मीक तात्या निकाळजे, विजय गोल्हार,राजेंद्र दहातोंडे,रावसाहेब लोखंडे, अंकुश चव्हाण,हनुमंत अडागळे, रामहरी महानोर,अनिल ढोबळे, शरद देसाई यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना खा. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्हा हा विस्तीर्ण आणि मोठा असून १४३१ ग्रामपंचायती आणि २२०३ गावे असल्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क करण्यास अडचण निर्माण होते आपल्या आशीर्वादामुळे रस्त्यांची कामे आणि रेल्वेची विकास कामे मी मंजूर केली असली तरी ही सर्व कामे सुरू झाल्यानंतर सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावी त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजगपणे या कामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून आपण गेल्या दोन टर्म मध्ये कोणत्याही गुत्तेदाराला पाहिले नाही आता मात्र गुत्तेदार कोण आहे हे पाहावे लागेल आणि कोणत्याही कामाचा गुत्तेदार कोणीही आणि कुठलाही असो त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे असल्याचे आग्रही प्रतिपादन केले माजलगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठी भेग पडली ही बाब उशिरा समजली दिल्ली येथील अधिवेशनामध्ये नितीनजी गडकरी यांचे कडे जाऊन त्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करण्यात आली त्यामुळे ही रस्त्याला मधोमध पडलेली भेग बुजवण्यासाठी थोडा उशीर झाला याबाबत तात्काळ माहिती समजली असती तर आणखी लवकर काम करता आले असते त्यामुळे अशा बाबी कळवण्याची नागरिकांनी दक्षता घ्यावी अहमदनगर ते आष्टी पर्यंतचे रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून सप्टेंबर अखेर अमळनेर पर्यंत रेल्वे धावली असती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आणखी थोडा कालावधी लागत असून या रेल्वे मार्गावरील शेतकऱ्यांच्या भूसंपादना बाबतच्या तक्रारींचे नवे निराकरण करण्यासाठी मी रेल्वे अधिकारी महसूल अधिकारी यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचे घरे विहिरी फळझाडे यांचे मूल्यांकन आणि संयुक्त मोजणी बाबत प्रश्न मार्गी लावला डिसेंबर अखेर सर्व शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळेल असे सांगून आष्टी ते बीड पर्यंत मध्यंतरी खडकाळ प्रदेश असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे काम पुरेशा वेगाने करण्यात अडचणी निर्माण होत आहेत परंतु तरीही सन २०२४ अखेर पर्यंत बीड पर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे राष्ट्रीय महामार्गाबाबतच्या सर्व मागण्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामार्फत बैठकीचे आयोजन करून सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे साबलखेड ते चिंचोली या रस्ता कामाचे भूमिपूजन संत बाळू देव महाराजांच्या मंदिर परिसरात होत असल्यामुळे पुढील सर्व काम निर्विघ्नपणे पार पडेल असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.. यावेळी बोलताना आ.सुरेश धस पुढे म्हणाले की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पंतप्रधान ग्राम सडक योजनेची सुरुवात झाली परंतु नंतरच्या काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दोन्ही शासन कालावधीमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोणतेही काम मंजूर झाले नाही आणि या योजनेअंतर्गत एक रुपयाचा निधी उपलब्ध झाला नाही मात्र सन २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जागी डॉ. प्रीतम ताई खासदार झाल्या नंतर या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये अनेक कामे मंजूर झाली बीड जिल्ह्यामध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यामध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत मात्र साबलखेड ते आष्टी या कामासाठी १५८ कोटी रु. निधी उपलब्ध असून सुद्धा सध्या चालू असलेले काम दर्जेदार पद्धतीने होत नसून अत्यंत मंद गतीने हे काम होत असल्यामुळे आष्टी आणि कडा धानोरा येथील व्यापाराचे अतोनात नुकसान झाले आहे कारण या रस्त्याच्या पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू झाली आहे या रस्त्याच्या कामाकडे खासदारांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
रेल्वे कामाबाबत बोलताना ते म्हणाले की रेल्वेचे अधिकारी आमदारांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत त्यासाठी तुमचेच आदेश महत्त्वाचे ठरतात असे सांगून आष्टी तालुक्यातील पिंपळा ते काकडवाडी या रेल्वे मार्गावरील पुलाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्यामुळे मुलांच्या शाळेमध्ये जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत असे सांगत रेल्वे मार्गावरील दोन गुंठे, तीन गुंठे असे भूसंपादनाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी आणि आम्हाला या बैठकीसाठी बोलवावे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सुटण्यास मदत होईल असे असे सांगून पुढे ते म्हणाले की सुरत ते चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावर खर्डा या ठिकाणी एन्ट्री गेट असल्याचे समजते त्यामुळे आष्टी तालुक्यातील प्रवासी नागरिकांना अडचणीचे होईल त्यामुळे आष्टी ते खडकत मार्गावर एन्ट्री गेट करण्यात यावे अशी मागणी केली
आष्टी तालुक्यातील दूध उत्पादन दररोज एक लक्ष पन्नास हजार लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढले असून खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे प्रयत्नाने आष्टी तालुका दूध उत्पादक पुरवठा संघासाठी दुधाचे गुणवत्ता तपासणी साठी दीड कोटी रुपये किमतीचे मशीन मिळून दिले असल्यामुळे सध्या तालुक्यामध्ये अत्यंत गुणवत्तापूर्णने दर्जेदार शुद्ध दूध निर्मिती होत आहे असे सांगितले..
stay connected