यंदा कापूस शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देणार का ?

 यंदा कापूस शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देणार का ?




दिवाळीपूर्वी पांढरे सोने फार दबावात होते. बाजारात कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. निदान दिवाळीनंतर तरी बाजार भाव तेजीत येतील अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र सध्या तरी अशी परिस्थिती तयार झालेली नाही. कापसाचे बाजार भाव अजूनही दबावात असल्याचे पाहायला मिळत आहे.


मात्र दिवाळीपूर्वी जो भाव मिळत होता त्यापेक्षा आता थोडा बरा भाव मिळत आहे. सध्या बाजारात कापूस 6850 रुपये प्रति क्विंटल ते 7 हजार 260 रुपये प्रति क्विंटल अशा कमाल दरात विकला जात आहे. सरासरी बाजार भावाचा विचार केला असता सरासरी बाजार भाव 6850 ते 7210 रुपये प्रतिक्विंटल एवढे आहेत.


खरंतर यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. यंदा मान्सून काळात सरासरीच्या तुलनेत 12% कमी पाऊस बरसला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. विशेषतः प्रमुख कापूस उत्पादक भागांमध्ये अर्थातच विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश मधील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण फारच कमी आहे.



यामुळे यंदा कापूस उत्पादनात मोठी घट येणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी कापसाला चांगला दर मिळाला तरच हे पीक शेतकऱ्यांना परवडेल नाही तर पिकासाठी आलेला खर्च देखील भरून निघणार नाही असे मत व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची यंदा कापसाला किमान 8000 रुपये प्रति क्विंटल ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यानचा भाव मिळाला पाहिजे अशी आशा आहे.


तूर्तास मात्र कापूस दर 7000 रुपये प्रति क्विंटल च्या आसपास फिरत आहेत. म्हणून उत्पादक शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान आता आपण आज राज्यातील प्रमुख बाजारात कापसाला काय भाव मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.


सावनेर एपीएमसी : आज या मार्केटमध्ये कापसाला किमान 6850, कमाल 6850 आणि सरासरी 6850 एवढा भाव मिळाला आहे.


भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये कापूस किमान सात हजार रुपये, कमाल 7050 आणि सरासरी 7025 या भावात विकला गेला आहे.


घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापूस किमान 6850, कमाल 6,960 आणि सरासरी 6900 या दरात विकला गेला आहे.


उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : हाती आलेल्या माहितीनुसार, या मार्केटमध्ये आज कापूस किमान 6900, कमाल 7050 अन सरासरी 7000 या दरात विकला गेला आहे.


मनवत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कापूस किमान 7,100, कमाल 7260 आणि सरासरी 7210 या भावात विकला गेला आहे.


नेर परसोपंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कापसाला किमान, कमाल आणि सरासरी 6900 प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.


बारामती एपीएमसी : या मार्केटमध्ये आज कापूस किमान 5001, कमाल 6851 आणि सरासरी 6800 या भावात विकला गेला आहे.


हिंगणघाट एपीएमसी : या बाजारात आज कापूस किमान 6800, कमाल 7170 आणि सरासरी 7000 या भावात विकला गेला आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.