संविधान सन्मान महासभेस तालुक्यातील सर्व संविधान प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - किशोर भोले
गेवराई (प्रतिनिधी ) - देशामध्ये मनुवादी प्रवृत्ती डोके वर काढत आहे सत्तेत बसलेले आर एस एसवादी लोक संविधानाची तोड मोड करत आहेत येणाऱ्या काळात rssला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे एकंदरीत संविधान बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे आणि या देशात स्वातंत्र्यापासून सत्ता भोगत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेना हे संविधान वाचवण्यासाठी कुठलीही ठोस भूमिका घेत नाही परंतु संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आदरणीय अँड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे कायम संविधान अबाधित रहावे म्हणून सातत्याने आर एस एसच्या विरोधात कडक भूमिका घेत आहेत त्यामुळे सर्व संविधानवादी, आंबेडकरवादी व सर्व समाज घटकांनी २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे शिवाजी पार्क येथे श्रध्देय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या ईतिहासिक संविधान सन्मान महारॅली व महासभेस गेवराई तालुक्यातील सर्व संविधान प्रेमी वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी २५ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका महासचिव किशोर भोले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
stay connected