समाजसेवक सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना १० लाखाच्या धनादेशाचे वाटप.
पाटोदा/ प्रतिनिधी
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा सुरू केल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अनेक मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याने समाजसेवक तथा जेष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी त्वरित आत्महत्याग्रस्तांचे प्रस्ताव पाठवण्यात यावेत अशी विनंती जिल्हा प्रशासनाला केल्याने तत्परता दाखवत सर्व तालुक्यातील विषेतः पाटोदा mतालुक्यातील तीन आत्महत्याग्रस्त कुटुबियांचे प्रस्ताव मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यालयाला पाठवून तालुक्यातील तीन मराठा व्यक्तींच्या वारसांसाठी प्रत्येकी दहा लाख मंजूर झाले केले. याचे वितरण उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार बालाजी चितळे यांच्या हस्ते व संघर्ष योद्धा तथा समाजसेवक सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी वाटप करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दोन महिन्याच्या कालावधीत बीड जिल्ह्यात एकूण दहा जणांनी आत्महत्या केल्या होत्या त्यापैकी पाटोदा तालुक्यातील तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्या होत्या. आरक्षणाच्या मागणीसाठी दोन महिन्याच्या कालावधीत अनेक तरुणांनी आत्महत्यासारखे पाऊल उचलल्याने तसेच मराठा समाजाचा वारंवार अपेक्षा भंग होत असल्याने, आत्म्हत्या केल्याने आरक्षण त्वरित मिळेल असा गैरसमज झाल्याने समाज बांधव हतबल होत असून नैरेशेतून आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे आत्महत्याच्यामागे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. एखाद्या जिवापुढे ही रक्कम तोकडी असली तरी मदत म्हणून हा निधी महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी दिला जात असतो. पाटोदा तालुक्यातील मयूर नायगाव येथील गोविंद गोपीचंद औटे, गांधवाडी येथील बंडू भारिबा पाचपुते व पाचंग्री येथील सुभाष भानुदास मुंढे यांच्या वारसांना मदत म्हणून पाटोदा तहसीलमार्फत प्रत्येकी दहा लाखाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी पाटोदा तहसीलचे कर्तव्यदक्ष क्लार्क ज्ञानेश्वर सरोदे, तलाठी गुंठाळ, तलाठी श्रीमती जगताप, तलाठी बडे, पारगाव येथील भाजपचे धस अण्णासमर्थक दत्ताजी साठे आदी गावकरीसह आत्महत्याग्रस्त कुटुंबीय उपस्थित होते.
stay connected