रस्ते अपघात ; खरंच टाळता येवू शकतात?
रस्ते अपघात. ही गंभीर बाब आहे. ते टाळता येवू शकतात काय? तर याचं उत्तर होय असंच आहे. परंतु त्याचे काही सरकारनं नियम घालून दिले आहेत, ते नियम पाळले तर.
अलिकडे घराच्या बाहेर पडणारा कोणताही व्यक्ती घराच्या बाहेर पडल्यावर तो केव्हा परत येईल? परत येणार की नाही? हे प्रश्न संभ्रमाचे ठरतात. कारण नेहमी रस्त्यावर अपघात घडत असतात. त्यातच बसचेही अपघात घडत असतात. समृद्धी महामार्गावर असे कितीतरी अपघात घडलेले आहेत .त्यामध्ये बसचेही अपघात सहभागी आहेत.
होणारे हे अपघात लक्षात घेता तो टाळण्यासाठी महाराष्ट्रातील एस टी महामंडळाकडून एक निर्णय घेतला. चालकाला त्यांनी ती गाडी चालवत असतांना मोबाईलवर बंदी घातली. त्याचं कारण आहे अपघात टाळणं. हा निर्णय योग्य व स्तुतीस्पद आहे. कारण मोबाईल बोलत असतांना एक लक्ष दुसरीकडून मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीकडे असतं तर दुसरं लक्ष त्याचं वाहन चालविण्यात. अशावेळेस कधीकधी फोनवरुन आडवे तिडवे बोलणे ऐकायला येतात. त्यावेळेस चालकाचं डोकं खराब होतं व त्याचं बसवरुन नियंत्रण सुटतं व अपघात होतो. व्यतिरिक्त तसंही बोलणं मोबाईलवर नसलं तरी बोलतांना लक्ष विचलीत झाल्यास चालकाचं नियंत्रण तुटतं. म्हणूनच एस टी महामंडळाचा तो निर्णय स्तुत्य.
आज तसं पाहता एस टी महामंडळाकडून जसा मोबाईलवर न बोलण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्णय सरकारनंही इतर वाहन चालकांसाठी घ्यावेत. त्यातच अपघात टाळण्यासाठी आणखी बरेच नियम लावावेत. ते बंधनकारक करावेत. जेणेकरुन अपघात टाळता येतील.
अलिकडे दारु पिणे वा नशा करणे व दारु पिवून वाहन चालविणे वा नशा करुन वाहन चालवणे ही सामान्य गोष्ट वाटते लोकांना. असे बरेचजण आहेत की जे दारु पिवून व नशा करुन वाहन चालवीत असतात. तसं वाहन चालवितांनाही नशेतून मेंदूचं लक्ष विचलीत होतं. त्यातच अलिकडील काळात पॉवर स्टेरींग आलंय. याबाबतीत एका वाहनचालकाच्या अपघाताचा प्रसंग सांगतो.
एकदा चार मित्र फिरायला निघाले. ते एका इनोवा गाडीत गेले. ज्या गाडीला पॉवरस्टेरींग होतं. ती गाडी ते मित्र चालवीत होते. ते जेव्हा परत फिरले. तेव्हा त्या मिंत्रांनी रस्त्यावर दारु ढोसली. त्यानंतर त्या मित्रांपैकी एकजण गाडी चालवायला लागला. त्यातच सायंकाळची वेळ होती. बाहेरची थंडी हवा लागत होती. त्यातच ती नशा हळूहळू वाढली. ती एवढी वाढली की चालकाला गाडी कशी नियंत्रीत करायची ते कळेना, त्यातच त्याचं गाडीवरचं नियंत्रण तुटलं. तशी गाडी वेगातच होती. अशातच पुढे एक वळण आलं. आता चालकानं त्या वळणावरुन गाडी वळवत असतांना ब्रेकवर पाय ठेवला. परंतु तो पाय ब्रेकवर न पडता थेट एक्सलेटरवर पडला व गाडी सुसाट वेगानं धावायला लागली. आता त्या गाडीच्या वेगानं व अंगातील दारुच्या नशेनं चालकाला सुचतच नव्हतं की ब्रेकवर पाय ठेवून गाडीला नियंत्रीत करायला हवं. त्यातच गाडीला पॉवर स्टेरींग असल्यानं तर आणखी समस्या. मग काय अपघात होणारच. तसा त्याचा अपघात झालात. गाडी झाडाला ठोकली. एअरबॅग निघाल्या व चालक आणि त्याच्या बाजूलाच बसलेला मित्र वाचला. मागचेही वाचले. मात्र एअरबॅग निघाल्यानं चालकाची खुर्ची मागं सरकल्याने मागच्या खुर्चीवर जो पाय लांब करुन बसलेला होता. त्याच्या पायाला अपघात झाला. तो एवढा अपघात तीव्र होता की त्याचं पायाचं हाड तुटलं. बरं झालं की चारही जण वाचले होते. नाहीतर चारही जण मरण पावले असते ही शक्यता नाकारता येत नाही. असे होतात अपघात.
अपघात टाळण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. परंतु चालक त्या गोष्टी करीत नाहीत. म्हणूनच अपघात होतात. अशा गोष्टी केल्यास अपघात टाळता येतो.
अपघात.......अपघात टाळण्यासाठी काही गोष्टी सांगणे गरजेचे आहे. त्यातील मुख्य गोष्ट करावी. ती म्हणजे वेगावर नियंत्रण, वेगावर नियंत्रण ही अशी गोष्ट आहे की जी हमखास अपघात टाळू शकते. जी सिस्टीम बसमध्ये वापरली जाते. गाडी जर वेगात असेल तर गाडीला नियंत्रीत करणं कठीण जातं. म्हणून गाडी कमी वेगातच असावी. अन् सरकारचाही वाहन चालविण्याचा परवाना देतांना तोच नियम आहे. परंतु लोकं ऐकतील तेव्हा ना. लोकं वाहनाचे नियम न पाळता आपल्याच मनमर्जीनं गाड्या चालवत असतात आपली वाहने व अपघात घडवून आणतात. आपणही मरतात अन् दुसऱ्या निरपराध व्यक्तीलाही मारतात.
दुसरी महत्वाची गोष्ट आहे पाहणे. चालकानं आपली गाडी पुढे पाहातच चालवावी. त्यातच गाडी वळवायची असल्यास आरशातून वा स्वतः मागेपुढे पाहात वळण घ्यावे. तेही कोणाशी न बोलता चालता. त्यातच पुर्ण होशहवासात. जर चालक पुढे पाहात नसेल व इकडच्या तिकडच्या भागाकडे लक्ष देत असेल वा गोष्टी करीत असेल आणि त्याचवेळेस अचानक एखादा व्यक्ती वा गाडी वा प्राणी पुढे आल्यास चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटतं व अपघात घडतो. जर तो गोष्टी करीत नसेल वा पुढेच पाहात तो गाडी चालवत असेल, त्यातच त्याचा वेगही नियंत्रणात असेल तर त्याला दुरुनच संभाव्य संकट दिसतं व अपघात होत नाही. तो टाळता येतो. हे नियम दोन्ही पक्षानं पाळायची असतात. हे नियम जर एकच पक्ष पाळत असेल तरही अपघात होत असतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज एस टी महामंडळाकडून मोबाईल बंदीचा वटहुकूम आला आणि पर्यायानं अपघात टाळण्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे. कारण त्या बसचालकाच्या हातात सत्तर अंशी प्रवाशांचं भविष्य असतं. तसाच नियम सरकारनंही सर्व वाहनचालकांसाठी लागू करावा. कारण तेही देशाचेच भविष्य असतात. तसंच बसचालकांसाठी वा इतर वाहन चालविणाऱ्यांसाठी कमी वेगात गाड्या चालवणे, दारु वा नशा करुन गाड्या न चालवणे, झोप वा झोपेची धुंदी येत असेल तर गाडी न चालवणे, कुणाशी बोलत चालत गाड्या न चालवणे, होशहवासात व पुर्णतः लक्षपुर्वक गाड्या चालवणे व विशेष सांगायचं म्हणजे मनात इतर कोणतेही विचार न करता गाड्या चालवणे महत्वाचे आहे. असे नियम हे सर्वांनीच पाळावे. हे नियम काही सरकार सांगणार नाही.
अपघात मनात विचार न करता गाड्या चालवणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. बरेचसे अपघात यामुळंच होत असतात. तसं पाहिल्यास हा नियम सरकारही लागू करु शकत नाही. कारण मन तुमचं आहे. सरकार कसं जाणेल तुमचं मन. त्यामुळं ते तुमच्या मनातील विचारांच्या बाबतीत कोणते नियम बनवणार. कोणतेच नाही. ती गोष्ट आपल्यालाच पाळायची आहे. तर कोणताही अपघात होणार नाही.
विशेष म्हणजे आपण आपल्या स्वतःचा व इतरांचाही जीव वाचवू शकतो हे तेवढंच खरं आहे. परंतु आपण वरील नियम स्वतः पाळू तेव्हा ना. आपण ते पाळत नाही, म्हणूनच अपघातही होत असतात. तसेच आजचा हा धकाधकीचा व वाढत्या लोकसंख्येचा काळ पाहिला तर आपला वा आपल्यामुळं इतर कोणाचा अपघात केव्हा होईल ते सांगता येत नाही. म्हणूनच वाहन चालवतांना वरील प्रकारचे नियम पाळून वेळीच काळजी घेतलेली बरी. जेणेकरुन अपघात टाळता येईल. तसेच आपला वा इतरांचाही जीव वाचवता येईल हेही तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
stay connected