अखेर देहूत येऊन तुकोबांच्या चरणी लीन होऊन धीरेंद्र शास्त्री यांनी मागितली माफी !
अखेर देहूत येऊन तुकोबांच्या चरणी लीन होऊन धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितल्याने यावर पडदा पडला आहे.
देहू संस्थानने देखील बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री महाराज यांना माफ करत माफी ही शिकवण संत जगद्गुरू तुकोबारायांची असल्याचं म्हटलं आहे. धिरेंद्र शास्त्री यांनी जगतगुरू संत तुकाराम यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात यावरून चांगलाच वाद सुरू होता. शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध होत होता. अखेर देहूत येऊन तुकोबांच्या चरणी लीन होऊन धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितल्याने यावर पडदा पडला आहे.
काय होते नेमके प्रकरण ? -
देहू संस्थानचे विश्वस्त नितीन मोरे महाराज म्हणाले , बागेश्वर महाराज यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला. ज्या दिवशी त्यांनी वक्तव्य केलं त्याच दिवशी त्यांनी माफी मागितली होती. वारकरी संप्रदायाने प्रत्येक मनुष्याला जगण्याचा धडा शिकवलेला आहे. शांततेचे प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे पाहिलं जातं. बागेश्वर महाराज आज तुकोबांच्या दर्शनासाठी आले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली. देहूत येऊन नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागितलेली आहे. आम्ही देखील त्यांना माफ केले आहे. तुकोबारायांची शिकवणच आहे की समोरचा माणूस शांत असेल आणि तो जर अग्नी झाला तर आपण दगड व्हायला पाहिजे. अन्यथा त्या अग्नीचा भडका होणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे
श्री संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर महाराज यांनी समस्त वारकरी संप्रदायाची माफी मागून यापुढे असली बेजबाबदार वक्तव्ये बंद करावीत. नाहीतर नाठाळाला वठणीवर आणण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा इशारा तुकाराम महाराजांचे दहावे वंशज हभप संभाजी महाराज देहूकर यांनी दिला होता.मती भ्रष्ट झालेल्या बागेश्वर महाराजांच्या आध्यात्मिक उचापती सुरू आहेत. शुद्ध, सात्त्विक वारकरी-भागवत संप्रदाय विटाळण्यासाठी त्यांची आणि त्यांच्या तथाकथित पाठीराख्यांची उठाठेव पुण्यनगरीत चालू असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
बागेश्वरमहाराज यांनी काही महिन्यांपूर्वी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. बागेश्वरमहाराज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. संत तुकाराममहाराजांवर केलेल्या टीकेचा समाचार संभाजीमहाराज देहूकर यांनी घेतला आहे. ते म्हणाले, की आध्यात्मिक किंवा संप्रदायात मोठे असल्याचे मिरवण्यासाठी संत आणि संतचरित्राची निंदा करणारे बागेश्वर महाराजांसारखे रागेश्वरी, भ्रमिष्ट, निंदक हे तुकोबारायांच्या काळातही होते. आजसुद्धा आहेत, हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचे दुर्दैव म्हणावे लागेल. ‘तुकोबारायांबाबत बागेश्वरमहाराज यांनी खोडसाळपणे वक्तव्य केले आहे. त्यांचा हा मूर्खपणा कोणालाच मान्य नाही. आध्यात्मिक सत्याचा खून करून असत्याचा डांगोरा पिटणाऱ्या भोंदूबाबाचा आम्ही निषेध करत आहेत,’ असेही ते म्हणाले होते .
मात्र आता बागेश्वर महाराजांच्या माफी मागीतल्या ने वादावर पडदा पडला !
stay connected