छगन भुजबळांना भाजपात पलटी मारायचीय - जरांगे पाटील

छगन भुजबळांना भाजपात पलटी मारायचीय - जरांगे पाटील



 मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यात आता मनोज जरांगे यांनी मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. 

छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांना पलटी मारायची सवय आहे., त्यामुळे त्यांना भाजपची ऑफर असेल असा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. भुजबळ तेढ निर्माण करणारे वक्तव्य करतायत. आमचे बॅनर फाडले जातायत. त्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना रोखावं अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठ्यांना त्रास देण्यासाठी ओबीसींना सरकारची फूस असल्याचा आरोपही मनोज जरांगेंनी केलाय. बॅनर फाडणारे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाहीये, दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसींना मदत करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय.

फडणवीसांची ऑफर - 

छगन भुजबळ यांना भाजपकडून काहीतरी ऑफर आली असणार कारण गृहमंत्री त्यांना थांबवत नाहीए, आणि काही बोलतही नाहीएत, असा दावाही जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान काल नाशिकमध्ये बोलताना मनोज जरांगेंनी गौप्यस्फोट केला होता. भुजबळ कुठे भाजी विकत होते, कुणाच्या येथे काय करत होते, त्यांनी कुणाचा बंगला हडप केला हे सर्व मला ठावूक आहे, असं जरांगेंनी म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.