राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मंत्र्यांची सकारात्मक भूमिका
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसे देता येईल यावर सविस्तर चर्चा झाली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असतानाच, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ओबीसीला धक्का न लावता आरक्षण कसं देता येईल, यावर सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं.
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, बुधवारी (२९ नोव्हेंबर, २०२३) झाली. या बैठकीत प्रामुख्यानं मराठा समाज आरक्षण, अवकाळी पावसामुळं झालेले शेतीचं नुकसान आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला असून, त्यावर मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली.
मराठा आरक्षणाबाबत मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी माहिती मिळते. मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण कसे देता येईल यावर सविस्तर चर्चा झाली. आरक्षणाबाबत वेळ पडली तर, केंद्र सरकारकडे दाद मागितली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच बिहारप्रमाणे आरक्षणाची टक्केवारी वाढण्याबाबतही चर्चा झाली.
आरक्षणावरून वातावरण चिघळू नये यासाठी प्रक्षोभक भाषणे करू नयेत, अशी तंबी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कळते.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत असून, या बैठकीनंतर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देईल, असं ते म्हणाले. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
stay connected