हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त मिरजेत भव्य दिव्य क्रांतीज्योत रॅली काढण्यात आली
हजरत टिपू सुलतान क्रांती ज्योत रॅलीची सुरुवात बाराइमाम,दर्गा लक्ष्मी मार्केट मार्गे,किसान चौक हजर खाजा शमना मिरा दर्गा मार्गे,स्वर्गीय अहमदबाशा चौक येथे रॅलीची सांगता झाली
क्रांतीज्योत रॅलीचे दीप प्रज्वलन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख सामजिक कार्यकर्ते नारायण बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व जाती धर्मातील पंथातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी जैलाब शेख म्हणाले की गेली अकरा वर्षे निरंतर व शिस्तबद्धतीने ही क्रांतीज्योत निघत असून.टिपू सुलतान हे आपल्या हयातीमध्ये ब्रिटिशांचे ईस्ट इंडिया कंपनीला सळोकी पळो करून सोडलेले होते भारत देशाच्या रक्षणासाठी आपल्या शरीराच्या रक्ताच्या शेवटचा थेंब असे पर्यंत इंग्रजांना या देशांमध्ये पाय ठेवू दिले नाही तसेच इंग्रजांना टिपू सुलतानची भीती होती टिपू सुलतानच नाव घेतला तरी त्यांच्या हृदयामध्ये धडकी भरायची अशा या वीर स्वातंत्र्यसेनानीच भारत देशात आद्य क्रांतिकारक म्हणून अशी ओळख असलेले हे टिपू सुलतान आहे पहिले मिसाईल मॅन म्हणून ही त्यांना जगभरात ओळखले जाते.अश्या महान देशभक्त विर योद्धाची जयंती ही संपूर्ण देशांमध्ये गल्ली गल्ली व चौकात चौकामध्ये साजरी झाली पाहिजे असे मत क्रांतीज्योत प्रज्वलित करताना जैलाब शेख म्हणाले .
यावेळी रॅलीमध्ये हजरत टिपू सुलतान जिंदाबाद हजरत..... टिपू सुलतान जिंदाबाद..... छत्रपती शिवाजी महाराजकी जय..... छत्रपती शिवाजी महाराजकी जय.... भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद.... भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद ...... अशाप्रकारे घोषणा देऊन परिसर दणाणून सोडलेले रॅलीला चोख पोलीस बंदोबस्त होता. रॅलीमध्ये रिक्षा व रथचा पण सहभाग होता.अनेक लहान मुले टिपू सुलतान यांचे वेशभूषा परिधान करून रॅलीमध्ये सहभाग झाले होते.क्रांतीज्योत रॅलीचे स्वागत मिरजेत चौकात चौकामध्ये फुले व फटाकडे वाजवून करण्यात आले दर्गा खादिम जमातीच्या वतीने अजगर शरीकमसलत ,हयात फाउंडेशन व मिरज सुधार समिती यांनीही हजरत टिपू सुलतान क्रांतीज्योत रॅलीचे स्वागत केले
हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त स्वर्गीय अहमदबाच्या चौकात हजर टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस जैलाब शेख यांच्या हस्ते हार अर्पण करून जयंती साजरी करून बिस्किट व फळांचे वाटप करून महाप्रसादाचे आयोजन केले होते याचा लाभ पाच हजार हिंदू मुस्लिम नागरिकांनी घेतला कार्यक्रमाचे संयोजन जमीर शेख, नारायण बेळगावकर,नासिर शेख,सात गवंडी,शकील शेख, गुलाम रसूल शेख,आदित्य बेळगावकर,शफिक मुल्ला आदींनी केले होते. शमशुद्दीन शेख ,मकतुम हुसेन,महमद शेख, नासिर मगदूम, महबूब शेख अहमद शेख,जुनेद शेख नजीर डांगे, नौशाद मुतवली, रॅलीमध्ये सद्दाम जमादार,यासीन जमादार,समीर संदी नजीर झारी,सद्दाम शेख,जैन सय्यद मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
stay connected