बीड जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची हेंडसाळ-- पँथर नितिन सोनवणे

 बीड जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांची हेंडसाळ-- पँथर नितिन सोनवणे



----------------------------------- 

आष्टी/प्रतिनिधी

सिविल हॉस्पिटल बीड या ठिकाणी गेल्या तीन दिवसांमध्ये मी स्वतः जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी लाईव्ह येऊन जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती सर्वसामान्य बीड वासीयांना दाखवलेली होती मात्र चार दिवसापासून आवाज उठून तिथली परिस्थिती जैसे तीच आहे  त्या ठिकाणी असलेले प्रिंटेड अद्याप दुरुस्त केलेलं नाही त्या ठिकाणी एक्स-रे रिपोर्ट, सोनोग्राफी रिपोर्ट ,सिटीस्कॅन रिपोर्ट व्यवस्थित पारदर्शक कागदावर दिले जात नाहीत साध्या पेपर वर दिले जातात 


म्हणून मी तोंडी व लेखी तक्रार केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कुठलीही दुरुस्ती झालेली नाही. ठोस पुरावा म्हणून सदरील व्हिडिओ आजचा सीएस साहेबांना दाखवला असता CS साहेबांनी दोन दिवसात दुरुस्त होईल असा शब्द दीला.बीड सिविल हॉस्पिटल या ठिकाणी काम करणारे कर्मचारी व स्टाफ सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे का असा प्रश्न पडतो? 


तसेच डॉक्टर व स्टाफ वेळेवर उपस्थित राहत नाही हे सुद्धा निदर्शनास आणून दिले डॉक्टर साहेब कुठे गेले असे सर्वसामान्य रुग्णांनी विचारल्यानंतर ते वर ऑपरेशन थेटर व ओटी मध्ये आहेत म्हणून उडवा उडविणे चे उत्तर दिले जातात,

सी एस यांची आज भेट घेऊन गेल्या कित्येक दिवसा पासून घडलेला प्रकार त्यांच्यासमोर तोंडी व लेखी स्वरूपात आज मांडला.


कामचुकार व मग्रुरी कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

म्हणून आज दिनांक 22/11/2023 रोजी बीड सिविल सर्जन यांना ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे


 की सर्वसामान्यांची हेंडसाळ थांबवा  रिपोर्ट सर्व व्यवस्थित द्या त्या ठिकाणी झालेली दुर्गंधी सर्व साफ करा अन्यथा सी एस यांच्या केबिनमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने दोन दिवसानंतर ठिय्या आंदोलन केले जाईल असा सुद्धा संघटनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे..







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.