अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर अहमदनगर ते विघनवाडी पर्यंत रेल्वे धावणार

 अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर
अहमदनगर ते विघनवाडी पर्यंत रेल्वे धावणार






आष्टी ता.१९ (प्रतिनिधी)- अहमदनगर- बीड -परळी हा एकूण २६१.२५ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून २३ सप्टेंबर २०२२ रोजी ६६.१८ किलोमीटर पुर्ण होत अहमदनगर ते न्यू आष्टी फेरीही सुरू झाली.  न्यू आष्टी ते विघनवाडी हा ६७.१२ किलोमीटर रेल्वे मार्ग पुर्ण होत असून डिसेंबर अखेर अहमदनगर ते इघनवाडी पर्यंत रेल्वे धावण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. एकूण २६१.२५ किलोमिटर पैकी १३३.३ किलोमीटर काम आता पुर्ण होऊन लवकरच या मार्गावर रेल्वे धावणार असून परळी पर्यंत रेल्वे पोहोचण्यासाठी आणखी किती वर्ष वाट पाहावी लागणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. अहमदनगर-बीड-परळी या मार्गासाठी एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत १४७.७७ किलोमिटर मल्टीट्रॅकिंग पूर्ण केली. २९८३.४७ कोटी रुपये खर्च आजपर्यंत झाला असल्याने आता लवकरच अहमदनगर-परळी रेल्वे मार्ग पुर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे.गेल्या अनेक वर्षापासून बीडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आता पुर्णत्वाकडे जात असून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे प्रगती पथावर काम सुरू आहे. हा मार्ग एकूण २६१.२५ कि.मी.चा असून या पैकी २३ सप्टेंबर २०२२ रोजी अहमदनगर-न्यू आष्टी पर्यंत पुर्ण होऊन रेल्वेची नियमित फेरीही सुरू झाली. परंतु मध्यंतरी या मार्गावरील रेल्वे डब्यांना आग लागल्याने सध्या या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्यात न्यू आष्टी ते विघनवाडी हे काम डिसेंबर अखेर पुर्ण होत आहे.

--------

आत्तापर्यंतच्या कामाची अशी आहे स्थिती


रेल्वे मार्गाची एकूण लांबी - २६१.२५ किलोमीटर,

काम पूर्ण होऊन रेल्वे धावली - ६६.१८ किलोमीटर,

बाकी असलेले काम - १९५.२५ किलोमीटर,

एकूण कामाची प्रगती - ७८ टक्के,

एकूण झालेले भूसंपादन - १८०३ हेक्टर (९९ टक्के),

 प्रकल्पाचा  खर्च - ४८०५.१७ कोटी,

आजपर्यंतचा खर्च ३६९९ कोटी.

_______


कामे अशी झाली


९७.४० टक्के (भराव व माती काम),

७७ टक्के (मोठे पुल - ४९ पूर्ण),

८३ टक्के (छोटे पुल - २५० पूर्ण),

४१ टक्के  (रेल्वे रुळाचे काम - ११८ किमी).

-------

पूर्ण झालेला टप्पा -

अहमदनगर ते आष्टी (६६.१८ किमी),


पूर्णत्वास असलेला टप्पा 

आष्टी ते इघनवाडी ६६.१२ किमी


प्रगतीपथावरील टप्पा

विघनवाडी ते परळी १२७.९५ किलोमीटर.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.