नगर - नासिक विरुद्ध मराठवाडा. जायकवाडी पाणी संघर्ष २१ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात

 नगर - नासिक विरुद्ध मराठवाडा. जायकवाडी पाणी संघर्ष २१ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात



यावर्षी निम्म्याहून कमी पाऊस कमी झाल्याने समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून ८.५० टी.एम. सी.  पाणी जायकवाडी धरणात  सोडण्याबाबत जायकवाडीचा पाणीप्रश्न आता चांगलाच पेटलाय. जलसंपदा विभागाने ८.५ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश देऊनही पाणी सोडलं जात नाही. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी या आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी  साखर कारखान्याच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान जायकवाडी धरणात मराठवाड्याच्या हक्काचं साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात यावं यासाठी जालन्यातील समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. 

मराठवाड्याच्या हक्काचं पाणी जायकवाडीत न सोडल्यास पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मराठवाड्यातून जाणारा साडेबारा हजार मेट्रिक टन ऊस रोखणार असल्याचं सांगत मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडीसाठी जाणारे मंजूर यंत्रसामुग्री परत बोलावणार असल्याचा इशारा घाटगे यांनी दिला.

त्यामुळे आत्ता पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला मराठवाड्यातील साखर कारखान्याचे अध्यक्ष आव्हान देणार असल्याने नवा संघर्ष बघायला मिळणार आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.