दुष्काळग्रस्त महसूल मंडळातून डोहीठाण मंडळाचा समावेश करा अन्यथा तहसीलसमोर उपोषण करू - कृष्णा मिसाळ
आष्टी तालुका दुष्काळाच्या छायेत असताना शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त महसूल मंडळातून डोहीठाण मंडळ वगळण्यात आले आहे. ही मंडळे दुष्काळग्रस्त यादीत घ्या, अन्यथा तहसीलसमोर उपोषण करू, असा इशारा कुष्णा मिसाळ यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आष्टी तालुक्यातील काही महसूल मंडळांचा समावेश करण्यात आहे आला होता. तसेच पुन्हा आठ तालुक्यांतील ५२ महसुली मंडळांचा दुष्काळ यादीत नव्याने समावेश
करण्यात आला. परंतु, यादीतून डोहीठाण मंडळ वगळले आहे फक्त बावी ला जासत पाऊस झाल्यान सपुर्ण मंडळच वघळले आहे परंतु आज डोहीठाण मंडळातिल पांगरा, महींदा, नागतळा,खडकवाडी मोराळा, वनवेवाडी,मिरडवाडी,माळेवाडी, पाठसरा, हतोला.खलाटवाडी.कापशी.धनंगरवाडी.सुरुडी. आश्या अनेक गावा मध्य पिनेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्या गावांमध्य जाऊं पाहनी करुन तहसील व तलाठी नी नवीन अहवाल पाठवा वा. अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आलेला आहे शासनाने दुष्काळग्रस्त यादी जाहीर केली परंतु काही महसूल मंडळे वगळली
कारण संपूर्ण डोहीठाण मंडळात कुठेच समाधानकारक पाऊस नाही. विहीर चे पाणीही आता अगदी मृतावस्थेत गेल्यामुळे
थोढ्याच दिवसांवरच शासनाला आता गावोगावी टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शक्ते, एवढा कठीण दुष्काळ असल्याचे चित्र दिसत आहे. सरकार कडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत.
जून पासून अध्यापपर्यंत पावसाळा संपला तरी पाऊस आलाच नाही. त्यामुळे शेतकरी हैरान झाला असून हातात यावर्षीचे उत्पन्नही त्यांना काहीच मिळले नाही. या मंडळातील शेतक-यांना अपेक्षा आहेत की सरकारने दुष्काळग्रस्तांमध्ये या महसूल मंडळाचा समावेश करावा असे निवेदन कुष्णा मिसाळ पाटील यानी तहशिलदार व आमदार बाळासाहेब आजबे काका यांना दीले दुष्काळग्रस्तांमध्ये तात्काळ समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली .
stay connected