दुधाचे दर वाढीबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा - आ.सुरेश धस यांची शासनाकडे विनंती
*********************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
शेतीला पूरक असणारा दूध उत्पादक व्यवसायी शेतकरी दुधाला प्रति लिटर ३४ रु. एवढा दर असताना समाधानकारक परिस्थितीमध्ये होता..मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये दुधाचे दर ३२,३०,२८, आणि आता २६ रु.प्रतिलिटर इतक्या खाली आल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्ग अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.. त्यामुळे दुधाची दरवाढ करणे अथवा दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि दूध पावडर निर्यातीसाठी प्रतिक्विंटल अनुदान जाहीर करण्यात यावे याबाबत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनाव्दारे आ. सुरेश धस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच दुग्धविकास मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली आहे.
या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीमध्ये दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एस.एन. एफ. असणाऱ्या दुधाला २६ रु. प्रति लिटर भाव मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दूध पावडरचे दर १९० ते २०० रु. इतके कमी झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. मात्र दूध पावडरचे दर असेच कोसळते राहिल्यास सध्याचा दुधाचा प्रतिलिटर २६ रु.दर कमी होऊन २३ रु प्रति लिटर इतका कमी होऊ शकतो यामुळे दूध उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत येणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील दुधावर प्रक्रिया करणारे अनेक प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये हजारो मेट्रिक टन पावडर निर्यात न झाल्यामुळे पडून राहिलेली आहे या दूध पावडरचे दर कमी झाल्यामुळे ही दूध पावडर परदेशामध्ये निर्यात झालेली नाही त्यामुळेच दुधाचे दर कमी झालेले आहेत.या सर्व परिस्थितीवर दुष्काळी पार्श्वभूमीवर दूध व्यवसायाशी निगडित असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे..
त्यामुळे राज्य शासनाने दुधाला प्रति लिटर ३ ते ५ रु.अनुदान देऊन थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत आणि केंद्र शासनाकडून दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहन म्हणून प्रति क्विंटल ५० ते १०० रु. अनुदान घोषित करावे त्यामुळे सध्या निर्याती अभावी पडून असलेली दुधाची पावडर परदेशामध्ये निर्यात झाल्यानंतर दुधाच्या दरामध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकेल.. महाराष्ट्र राज्यामध्ये काही ठिकाणी अत्यंत अपुरा पाऊस असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच पशुखाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमती देखील वाढत असल्यामुळे पशुखाद्य देखील महाग होत आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी संकटास सामोरे जावे लागत आहे सन २०१८
मध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा म्हणून प्रति लिटर ३ ते ५ रु. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते त्याच त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय तात्काळ घ्यावा अशी विनंती या निवेदनामध्ये
केली आहे.
stay connected