डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या संदर्भात भिमसैनिकांनी घेतली आ.सुरेश धस यांची भेट..!

 डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या संदर्भात भिमसैनिकांनी घेतली आ.सुरेश धस यांची भेट..!



----------------------------------------

संदिप जाधव /आष्टी

सध्या साबलखेड ते आष्टी या १७  किलोमीटर रस्त्याच्या कामाला गेली तीन महीन्यापासुन सुरूवात झाली आहे.

यामध्ये कडा शहरातील अनाधिकृत असलेले अतिक्रमणे पाडण्यास सूरुवातही झाली आहे.

दिपावली निमित्त अतिक्रमणे पाडण्याला तात्पुर्ती स्थगिती दिली होती.परंतु आता पुन्हा राहीलेले अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात होईल.

परंतु कडा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याच अनुषंगाने रविवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आमदार सुरेश आण्णा धस यांच्या निवासस्थानी समस्त भिमसैनिकांनी त्यांची भेट घेतली.व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा.अशी मागणीही करण्यात आली आहे.

कडा हे मुख्य बाजारपेठ असणारे शहर आहे.कड्याची बाजारपेठ ही मोठी आहे.

खेडोपाड्यातील लोक कड्याला विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी येत असतात.

म्हणजेच कडा शहर हे  दळणवळणाचे मुख्य ठिकाण आहे.

कडा शहरात रविवारी जनावरांचा बाजार भरतो.तसेच भाजीपाल्याचाही  बाजार असल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतुकीची खुप मोठी कोंडी निर्माण होते.

त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसवल्यावर मोठा सर्कल निर्माण होईल आणि वाहतुकीची कोंडीही निर्माण होणार नाही.

व पुतळा मध्यभागी बसवल्याने कडा शहर हे सुंदर दिसेल.

त्यामुळे सर्व भिमसैनिकांनी आमदार सुरेश आण्णा धस यांची भेट घेतली व आमदार सुरेश धस म्हणाले की,मी संबंधीत अधिकार्‍यांशी चर्चा करतो व आपली मागणी मान्य करायला लावतो असा शब्द आमदार सुरेश धस यांनी दिला आहे.

लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात येणार असल्याने भिमसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी यशवंत खंडागळे, महालिंग निकाळजे,राहुल जाधव,सुभाष भादवे, दिपक भैय्या गरुड, अशोक जाधव, अतुल जाधव,पोपट गर्जे,अशोक निकाळजे,राजु साळवे,भाऊ मोरे, रमेश जाधव, पत्रकार संदिप जाधव सह सर्व भिमसैनिक उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.