संभाजी सेनेच्या आंदोलनाला भिम आर्मी भारत एकता मिशचा जाहीर पाठिंबा

 संभाजी सेनेच्या आंदोलनाला भिम आर्मी भारत एकता मिशचा जाहीर पाठिंबा

 कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली



लातुर प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे


आज दिनांक ४सप्टेंबर रोजी लातुरात संभाजी सेनेच्या वतीने  गूळ मार्केट समोर रास्ता रोको करण्यात आले  

पावसाळा चालू असूनही महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी निराशामय जीवन जगात आहे खासगी सावकाराकडून  व्याजाने पैसे काढून शेतकऱ्यांनी शेतात पेरण्या केल्या आहेत, पण निसर्गाने साथ दिली नसल्याने शेतकरी निराश झालेला आहे व्याजाने काढलेले पैसे भरायचे कसे या विचारात शेतकरी आहे या निराशातून शेतकरी यांनी चुकीचे पाऊल  उचलू नये(आत्महत्या ) करु नये.म्हणून शेतकऱ्याच्या प्रत्येक आंदोलनाला भिम आर्मी भारत एकता मिशन सोबत आहे

आज लातूर शहरांत संभाजी सैनेच्या वतीने रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले होते  या आंदोलनात प्रामुख्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी म्हणून गूळ मार्केट समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सितारामजी गंगावणे साहेब यांच्या आदेशाने पाठिंबा देण्यात आला आहे.  यावेळी महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे,मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, जिल्हाप्रमुख विलास आण्णा चक्रे, जिल्हासंघटक बबलू गवळे, लातूर शराध्यक्ष संदीप कांबळे आदी उपस्तिथ होते भिम आर्मीचे व संभाजी सेनेचे हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.