MNS Party Miting : दोन्ही ठाकरे एकत्र येणार का Ajit Pawar News
अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) सामील झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र येणार यावे अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया, असा सूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) बैठकीत उमटला आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.
राज्यात काल घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमी आपला पक्ष पुढे कसा न्यायचा याबाबत आज मनसेची बैठक झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे यावर चर्चा झाली. तसंच ती कशी लढायची यावर राज ठाकरेंनी नेत्यांचं मत जाणून घेतलं.
MNS बैठकीत काय घडलं?
या बैठकीत उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. याआधी 2017 च्या महापालिका असो किंवा त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका त्यावेळीही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा राज ठाकरे यांनी उघडपणे हात पुढे केला होता, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला नव्हता. स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून राज ठाकरेंकडे विनंती केली की आता वेळ बरोबर आहे. मराठी माणासांची अस्मिता जपण्यासाठी ठाकरेंनी एकत्र यावं अशी जनभावना आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यावर विचार करायला हवा, अशी विनंती करण्यात आली.
मेळाव्यात भाष्य करु : Raj Thakrey
या बैठकीत उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देऊया असा सूर उमटला. मात्र राज ठाकरे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत विचारलं असता आपण मेळाव्यात याबाबत भाष्य करु असं राज ठाकरे म्हणाले.
आता तरी एकत्र या, दादरमध्ये बॅनर्स
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसेकडून शिवसेना भवन आणि दादर परिसरात लावण्यात बॅनर आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी लावले आहेत. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला…राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे असा मजकूर यात लिहिलं आहे. दादर शिवसेना भवन परिसरातील या बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे
stay connected