Ajit Pawar News live : महाराष्ट्रातील वेगवान राजकीय घडामोडी Maharashtra
अजितदादांमुळेच मी राष्ट्रवादीत; मी दादांसोबतच” राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांचं स्पष्टीकरण,
महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजित दादांनी हा निर्णय घेतला आहे. राजकारणातला चिखल साफ करण्यासाठी अजित दादा शिंदे-फडणवीसांसोबत मी आहे. अजित दादांनी जे केलं ते बंड नव्हे जनतेच्या हितासाठी ते भाजपसोबत गेले आहेत असं राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केलं.
अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार
अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विधीमंडळासमोर धाव घेतली
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विधीमंडळासमोर धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष कार्यालयात राष्ट्रवादीचे सात ते आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीचा मोठा गट फुटला आहे. मागच्यावेळी शिवसेनेचा मोठा गट सुध्दा फुटून आमच्यासोबत आला आहे. शरद पवारांनी सुध्दा असचं राजकारण केलं होतं. सध्याचं सगळं लोकशाहीला सोडून होतं का असंही गिरीश महाराजन म्हणाले.
...म्हणून आम्ही शरद पवारांसोबत - बाळासाहेब पाटील
आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे असल्याने शरद पवारांसोबत आहोत. कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कराडमधील शरद पवार यांच्या दौऱ्याचं संपूर्ण नियोजन बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
लवकरच भूमिका घेऊन बाहेर पडू - बाळा नांदगावकर
बाळासाहेबांची प्रतिकृती राज ठाकरे आहे. त्यांना आम्ही अभिवादन करण्यासाठी आलो होतो. उद्धव ठाकरे एकत्र यावे, यासाठी मी मागे देखील प्रयत्न केले होते. ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची जरी इच्छा असली, तरी साहेब मेळाव्यात भूमिका मांडतील. आता जे काही चालू आहे, ते अनाकलनीय आहे. लोकांना अशा गोष्टी आवडत नाही. महाराष्ट्रात जे काही घडतं आहे, ते कोणत्याच माणसाला आवडलं नाही. आम्ही लवकरच भूमिका घेऊन बाहेर पडू, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
आमच्या नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य - शंभूराजे देसाई
आमचे जे नेते आहेत, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे. आमचे सर्व आमदार 100 टक्के खुश आहेत. कोणीही आमदार नाराज नाही. ते आमच्याकडे आलेले आहेत, परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे अजिबात नाराजी नाही. आम्हाला शिंदे साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे, असे शंभूराजे म्हणाले.
भाजपचं युज अँड थ्रो सुरुंय - प्रियंका चतुर्वेदी
अजित पवार निधी देत नाहीत, अशी तक्रार शिंदे गटातील आमदार करत होते. मग हे आज त्यांच्यासोबत कसे बसले, असा सवाल खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे. शिंदे गटातील जे आज मंत्री आहेत, त्यांना संत्री पण होता येणार नाही. भाजपचे राजकारण युज अँड थ्रो असं सुरू आहे. विरोधकांच्या एकजुटीमध्ये अजित पवारांच्या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही, असे प्रियंका चुतर्वेदी म्हणाल्या.
महाविकास आघाडी संपलीय - नितेश राणे
प्रफुल पटेल म्हणतात की, लवकरच भूमिका स्पष्ट होईल. महाविकास आघाडी संपलेली आहे. सरकार पडणार आहे. मुख्यमंत्री पडणारे यापेक्षा अंबादास दानवे तुमचा विरोधी पक्षनेता राहतो का ते बघा. पुढच्या अधिवेशनात वरच्या सभागृहात उबाटाचा गट विरोधी पक्ष नेता राहणार नाही. समृद्धी महामार्गवर अपघात झाला म्हणून आमच्या आशिष शेलार यांनी आंदोलन करणं मागे घेतलं आहे, मात्र आदित्य ठाकरे यांनी घेतलं नाही. महाविकास आघाडी सरकारवर अंत्यसंस्कार झालेले आहेत. काल महाविकास आघाडीच्या फोटोला हार घातला आहे. महाविकास आघाडी संपलेली आहे.
पुढचा काळ हा क्राँग्रेसचा - यशोमती ठाकूर
काही दिवसाआधी शिंदे साहेब मविआमधून बाहेर पडले. पण त्यांनी जे कारण सांगितले, तेच कारण आता त्यांच्यासोबत आहेत. पुढचा काळ हा क्राँग्रेसचा आहे. अस लबाडीचं राजकारण चालत नाही. हा खेळ लगेच संपणार आहे. सरकारने निवडणुका लावल्या पाहिजेत. मग बघा लोक कोणाला कल देतात ते. आता शिंदे साहेबांकडे काहीच राहणार नाही. वैचारिक जो पगडा आहे तोच राहिल. ज्यांच्याकडे जास्त आकडे, त्यांचा विरोधीपक्ष नेता असा नियम आहे. नियम कोण मोडणार नाही. हे वास्तविक आहे. तुम्ही कराडला आता पाहिलं असेल. मविआ तुटली असं काही नाही. जे मूळ आहे ते तिकडेच आहेच. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार. काँग्रेस बद्दल बोलण्याचा विखे पाटलांना काही अधिकार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
stay connected