सामुहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणारी मदत सरकार २५ हजारांपर्यंत वाढवणार.... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यांची घोषणा

 सामुहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणारी मदत सरकार २५ हजारांपर्यंत वाढवणार....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यांची घोषणा



*पालघर जिल्ह्यातील एका सामूहिक विवाह सोहळ्यात शिंदे बोलत होते, त्यांच्या उपस्थितीत किमान ३२५ जोडप्यांनी लग्नगाठ बांधली.*


दि.२० पालघर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले की, सामुदायिक विवाह सोहळा अतिशय स्त्युत्य उपक्रम असून असे सोहळे म्हणजे काळाची गरज आहे.यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण घोषणा करताना अशा सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत १०००० रुपयांवरून २५००० रुपयांपर्यंत वाढवली जाईल असे सांगितले. पालघर जिल्ह्यातील बोईसर मधील एका सामूहिक विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते, त्यांच्या उपस्थितीत किमान ३२५ जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांना मोठ मोठे विवाह परवडत नसल्यामुळे सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे.

खोटा आव आणून कर्जबाजारी होण्यापेक्षा सामूहिक विवाह समाजातील सर्व घटकांना मोठा दिलासा देण्याचे कार्य करीत असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते रवींद्र फाटक, माजी केंद्रीय राज्य मंत्री आनंदराव अडसूळ, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, शिवसेना उपनेते राजेश शहा, उपनेत्या ज्योती मेहे, शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, कुंदन संखे, नीलेश तेंडोलकर, महिला जिल्हा संघटक वैदही वाढाण, टीमाचे अध्यक्ष वेलजी घोगरी, डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे आणि जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे यांच्यासह पालघर जिल्हा आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.