शिवराज विजय पवने सेल्फी स्पर्धेत राज्यस्तरीय तृतीय
***************************
जीवन गौरव ,महाराष्ट्र शिक्षक पॕनल व जि प उच्च प्राथमिक शाळा वसार आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा सेल्फी विथ आजी - आजोबा यामध्ये जि प प्राथमिक शाळा वाळकेवाडी चा इयत्ता पहिलीचा विद्यार्थी शिवराज विजय पवने याने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळविला आहे.
देविनिमगावचे सरपंच आदरणीय संदिपदादा मार्कंडे उपसरंच काकासाहेब ढवळे शाळा व्य स अध्यक्ष दत्तूदादा पवने,ग्रामपंचायत सदस्स्य आसाराम अनारसे,जेष्ठ नागरिक मोहनदादा पवने,बाळूदादा अनारसे,विजय पवने,द्वारका पवने ,मनिषा अनारसे ग्रामस्थ पालक यांनी शाळेत येऊन शिवराजचा सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्रतसेच रोख रक्कम देऊन सत्कार केला.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.चांगल्या शैक्षणिक कार्यासाठी दोन्ही शिक्षिकांचे कौतुक केले.पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.जि प प्रा शाळा वाळकेवाडी चा उपक्रमशील शाळा म्हणून सन्मानचिन्ह देऊन दोन्ही शिक्षिकांचा सन्मान केला.यापुर्वीही जि प प्रा शा वाळकेवाडीच्या विद्यार्थ्यांनी आकाशवाणी प्रसारण,जिल्हास्तरीय निबंध,हस्ताक्षर,भाषण स्पर्धेत यश ,जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विविध स्पर्धेत यश संपादन केलेले आहे.
तसेच या शाळेतील मंगेश वाळकेचा माझे पप्पा निबंध सातासमुद्रापलीकडे व्हायरल झाला होता.अभ्यासक्रमाबरोबर
शालेय तसेच सहशालेय उपक्रमातून घडविणारा श्रीमती शेख नजमा मैनुद्दिन आणि कन्हेरकर वंदना रघूनाथ दोघींचे तसेच शिवराज विजय पवनेचे पंचायत समिती आष्टीचे गटशिक्षणाधिकारी श्री सुधाकर यादव साहेब
शा व्य समिती अध्यक्ष श्री दत्तू रामभाऊ पवने, स्पर्धा आयोजक सौ बागुल मॕडम ने तसेच केंद्रप्रमुख अरुणा पवार मॕडमनेकेले. अभिनंदन केले.
stay connected