“त्रिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की"***************************आष्टी शहरात भगवान महावीर जयंतीचा उत्साह..*****************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी)
सुमधूर वाद्यांच्या गजरात अन् “जय महावीर, ञिशला नंदन वीर की,जय बोलो महावीर की” असा एकच जयघोषात सकल जैन समाजाच्या उपस्थितीत उत्साहात भक्तीमय वातावरणात महावीर जयंती निमित्त मंगळवार दि.४ रोजी सकाळी आष्टी शहरात भगवान महावीर यांची पालखी शोभायात्रा काढण्यात आली होती.या अहिंसा रॅलीत आ.सुरेश धस स्वत; सहभागी होऊन शुभेच्छा देत जैन बांधवांचा उत्साह वाढवला.
जैन धर्माचे ४ थे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरातील जैन मंदिर येथे महावीर यांचे दर्शन घेऊन त्यांच्या पालखी शोभायात्रेत आ.सुरेश धस हे सहभागी झाले होते.तसेच भगवान महावीर यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी जैन समाजाच्या वतीने आ.सुरेश धस यांचा सत्कार करण्यात आला.
विश्वाला अहिंसेचा संदेश देणा-या भगवान श्री महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव आष्टी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जैन स्थानक येथे समाज बांधव सहभागी झाले होते.जैन बांधवाने पांढरे कपडे परिधान करून सहभागी झाले होते.यावेळी मिरवणूकीत अंहिसा परमो धर्म की जय..जैन धर्म की जय,जोर से बोलो जय महावीर आशा जयघोषाणेने संपूर्ण शहर दुमदुमले जैन स्थानक,जैन मंदिर,कमानवेस, आनंद ऋषिजी चौक, रामगल्ली,साईबाबा मंदिर या मार्गी शोभायाञा काढून जैन स्थानक येथे समारोप करण्यात आला.यावेळी सकल जैन श्रावक संघ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected