सामाजिक बांधिलकी जपणारी शिक्षिका, लेखिका, कवयित्री, यांना “काव्य गौरव पुरस्कार” जाहीर.
न्यायिक लढा पत्रकार सेवा संघ पुणे जिल्हा यांच्या वतीने साहित्य,कला,क्रीडा, सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल१३ एप्रिल २०२३ चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विविध मान्यवरांना साहित्य कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
कवयित्री,लेखिका,शिक्षिका सोबत सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व,रोखठोक बोलणारी,अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध आवाज उठवणारी अशी त्यांची ओळख आहे.सामाजिक कविता,महापुरुषांच्या प्रेरणादायी कविता,निसर्ग कविता,स्री मनाच्या वेध घेणाऱ्या कविता,सामाजिक प्रश्न,स्री -पुरुष समानता,महिलांवरील संकटे,दैंनदिन घडामोडी यावरील कविता व लेख यांच्या माध्यमातून समाजात परिवर्तन करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे योगदान दिसून येते.
शाळेतील विध्यार्थी यांना खाऊ वाटप करणे,शैक्षणिक साहित्य वाटप करणे, गरीब विध्यार्थी यांना मदत करणे,पर्यावरण चळवळीत सक्रिय सहभाग याच कार्याची पावती म्हणून,न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. विकास गोविंदराव राऊत यांनी सौ.प्रतिमा अरुण काळे,निगडी प्राधिकरण पुणे,४४ यांच्या साहित्य,सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांना "काव्य गौरव पुरस्कार" जाहीर केला आहे.
stay connected