भगवान महावीर जयंती निमित्त प्रा.गणेश शिंदे यांचे आष्टीत व्याख्यान ............................
आष्टी प्रतिनिधी
भगवान महावीर जयंती निमित्त आष्टी जि.बीड येथील आनंद ऋषीजी चौक,कापड बाजार येथे सकल जैन समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी रात्री 8.30 वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांचे आयुष्यावर बोलू काही व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती सकल जैन संघाच्या वतीने देण्यात आली आहे.जगा आणि जगू द्या हा संदेश भगवान महावीरांनी जगाला दिला.त्यांच्या जयंती निमित्त प्रति वर्षाप्रमाणे भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.प्रा.गणेश शिंदे यांचे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणारे असे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.आजवर सिंधुताई सपकाळ,विवेक घनसाळी,डॉ.जरा काझी,डॉ.जाधव,विनोद सम्राट दीपक देशपांडे,डॉ.सतीश साळुंके,संजय कळमकर,अशा अनेक वक्त्यांनी या व्यासपीठावर हजेरी लावली आहे.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, दरवर्षी या व्याख्यानाला हजारोंनी लोक उपस्थित राहतात.
stay connected