*अन्नपुरवठ्याबाबत सहा सदस्यीय समिती गठीत -भाई शिवाजीराव सुरवसे पाटील*
*शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्या अंतर्गत वितरित करण्यात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी वितरण आदींवर होणाऱ्या शासनाच्या परिणामी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय कमी करण्यासाठी व उत्पादकांना व ग्राहकांना किफायतशीर किमती मिळवण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याने राज्य अन्न आयोगाला दिलेल्या अधिकाराचा वापर करून "जिथे पिकेल तिथेच विकेल" या धर्तीवर स्थानिक पातळीवर शेतकरी;बचत गट; शेतकरी** *उत्पादक;कंपन्या ग्रामपंचायत किंवा शेतकरी यांच्याकडून अन्नधान्य पुरवठा संकलन करावे या विषयाची मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे 231 आष्टी, पाटोदा,शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाई श्री शिवाजीराव सुरवसे पाटील यांनी अन्नसुरक्षा कायदा कलम 16 अन्वये राज्य अन्न आयोगाकडे केली होती. त्या त्या अनुषंगाने सुनावणी दरम्यान आयोगाने "जिथे पिकेल तिथेच विकेल" या धर्तीवर अन्नधान्य संकलन मोहीम करून तेथेच वितरण केल्यास वाहतूक आदींवरील शासनाचा प्रचंड खर्च वाचेल.*
*व परिणामी करदात्यांच्या कराचा अपव्यय थांबेल.तसेच विविध प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होऊन शेतकऱ्यांना देखील त्यांच्या मालस योग्य व रास्त भाव मिळेल व ग्राहकांना देखील* *जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य व रास्त दरात होईल त्याचबरोबर शेतकरी गट, ग्रामपंचायत शेतकरी, उत्पादक कंपन्या, ह्या देखील सक्षम होतील.*
*अर्जदाराच्या वतीने ॲड. अजय तल्हार युक्तिवाद केला. त्यानुसार आयोगाने सहा सदस्य समिती स्थापन करून या समितीला चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे कळवले आहे.*
stay connected