कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा....सुरेश पाटोळे.
•••••••••••••••••••••••••••••••
बीड /प्रतिनिधी
ग्रामीण व शहरी भागात अचानक उद्भवलेल्या अस्मानी व सुलतानी संकटावर मात करण्यासाठी अनेक पिढीत कुटुंब आपला संसाराचा गाडा आर्थिक दृष्ट्या सुरळीत चालावा म्हणून आर्थिक सहकार्य करणाऱ्या बँक किंवा पतपेढीकडे अनेक कागपत्रे जमा करूनही कर्ज मिळत नसल्याने खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले जाते. लबाड व लुटारू खाजगी अवैध सावकारांच्या जाळ्यात अलगत अडकल्याने अनेक पिडीत कुटुंबे आत्महत्या करतात. गुंड प्रवृत्तीच्या सावकारांनी अनेक कुटुंबाचा आजपर्यंत छळ केलेला आहे. यांचे अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे असे खाजगी अवैद्य सावकार मनमानेल तसे व्याज लावुन घेतलेल्या पैश्याच्या मोबदल्यात कर्जदार कुटुंबाची वडिलोपार्जित मालमत्ता स्वतःच्या किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावावर करून घेतात. त्यांना अवैध मार्गाला लावून त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळें असे अनेक कुटुंब खाजगी सावकारांच्या शिकार बनतात. आजपर्यंत अनेक अवैध खाजगी सावकारांनी ग्रामीण भागातील गरीब व अल्पसंख्यांक कुटुंबांच्या जमिनी लिहून घेतलेल्या आहेत. तसेच शहरातील राहते घर व प्लॉट नावावर केलेले आहेत. त्यामुळे अश्या अनाधिकृत सावकारकी व्यवसायावर शासनाने बंदी घालून तक्रार आल्यास त्वरीत करवाई करून कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचे आवाहन शिव संघर्ष ग्रुप चे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी गृहविभागाला केले आहे.
सुरेश पाटोळे यांनी पुढें बोलतांना सांगितले आहे की, राज्यात अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ ची प्रभावी अमलबजावणी झाली पाहिजे. जेनेकरून अश्या अवैध सावकारकीला आळा बसेल व असे अनाधिकृत असलेल्या सावकारकीला कोणी धजावणार नाही. जर पोलीस स्टेशनला अवैध सवकाराविरुध्द तक्रार प्राप्त झाल्यास गृह विभागाने त्वरीत दखल घेवून अश्या सावकारांचा बंदोबस्त करून त्यांना चांगली अद्दल घडवावी जेणेकरून पुन्हा अश्या गोष्टी करण्यास अवैध सावकार १०० वेळा विचार करेल. आणि अशी अवैध सावकारकी केली जाणार नाही. तसेच गरीब कुटुंब सावकारकीच्या जाळ्यात अडकणार नाहीत.
•••••••••••
stay connected