अंभोरा येथे कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या !
अंभोरा (प्रतिनिधी ) - आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली .
अंभोरा येथील शेतकरी कांतीलाल नारायण गवळी वय ४२ वर्षे या कांदा उत्पादक शेतकर्याने शनिवारी पहाटेच्या सुमारास वस्तीवरील घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली . काही दिवसांपूर्वी त्याने कांदा मार्केटला ३०० गोण्या कांदा विक्रीसाठी नेला होता मात्र समाधानकारक भाव न मिळाल्याने व कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातुन त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते . कांदा लागवडीसाठी त्याने स्थानिक पतसंस्थेकडून ४ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते . मात्र पुरेसे उत्पन्न न झाल्याने त्याने नैराश्यातुन आत्महत्या केली . अंभोरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी मृतदेह सुलेमान देवळा येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात पाठवला . या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
stay connected