*कडा येथील डॉ.महेश नाथ यांच्या वाढदिवसानिमित्त नवजीवन संगोपन केंद्र आष्टी येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत*
==============================================
आष्टी प्रतिनिधी
कडा येथील सुप्रसिद्ध दाताचे डॉक्टर आणि आम आदमी पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष डॉ.महेश नाथ यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत व्यर्थ खर्च टाळून नवजीवन संगोपन केंद्रातील अनाथ, निराधार,गोरगरीब, वंचित विद्यार्थ्यांना मदत देऊन साजरा केला.
वाढदिवस म्हटला की, प्रत्येकजण पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात. परंतु नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवकांचे प्रेरणास्थान,गोरगरीब जनतेला सदैव मदत करणारे डॉ.महेश नाथ कडा यांनी आपला वाढदिवस आष्टी शहरातील नवजीवन संगोपन केंद्रातील गोरगरीब अनाथ निराधार विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच फुल ना फुलाची पाकळी का होईना समजाचे आपण काहितरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून सामाजिक उपक्रमाने साजरा केला.
यावेळी डॉ.नाथ बोलताना म्हणाले की म्हस्के मेजर आपण खूप छान करत आहात या सामाजिक कार्यात आमची जेंव्हा कधी गरज भासेल तेंव्हा हक्काने आम्हाला सांगा आम्ही ती नक्की पूर्ण करू.आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण या गोरगरीब मुलांना त्यांचे पालक होऊन त्यांचे दुःख वाटून घेऊन तसेच त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून या प्रकल्पास शासनाचे कसलेही अनुदान नसताना आनंदाने सांभाळता हे खूप चांगले आणि पुण्याचे कार्य आहे.आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
यावेळी नवजीवन संगोपन केंद्र आष्टी चे संस्थापक अध्यक्ष विकास म्हस्के मेजर यांनी गोर गरीब मुलांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने डॉ.साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
stay connected