*सावधान..!आवकाळी,गारपीट,विजांचा कडकडाट होतोय मग हे करा- डॉ. जितीन वंजारे*

 *सावधान..!आवकाळी,गारपीट,विजांचा कडकडाट होतोय मग हे करा- डॉ. जितीन वंजारे*




            हवामान खाते कितीही प्रगत झालेअसले  तरी निसर्गाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही, ग्लोबल वार्मिंग वाढल्यामुळे पावसाची अनियमितता झालेली आहे,दुष्काळग्रस्त परिस्थिती, अतिवृष्टी, अवकाळी या सर्व गोष्टी वातावरणातील बदलामुळे होतात. अति वृक्षतोड, नष्ट झालेली जंगले,पर्यावरणाचा झालेला रास,नदीमध्ये झालेली घाण,पानी,हवा प्रदूषण, पृथ्वीवर झालेले ईतर प्रदूषण, मानवनिर्मित तयार झालेला कचरा व इत्यादी सर्वांमुळे पर्यावरणात झालेले बदल यामुळे ऋतूंमध्येही अनिष्ट परिणाम झालेले आहेत.ऋतुबदल जसे की पावसाळ्यात हिवाळा, हिवाळ्यात पावसाळा, उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, पावसाळ्यात दुष्काळ, उन्हाळ्यात गारा,ऊन अशा विपरीत परिणामांना सामोरे जाऊन निसर्गाने भूकंप, त्सुनामी , वादळवारे, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, विजांचा कडकडाट इत्यादींसह अनेक आघात पृथ्वीवरती केलेले आहे चला तर मग आज आपण अवकाळी पावसामध्ये होणाऱ्या विजांच्या कडकडाटा पासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी जाणून घेऊया

*तडीताघात म्हणजे काय ?*-  पृथ्वीवरील तापमानामुळे समुद्रातील पाण्याची वाफ होते ती वातावरणावर तरंगतात आणि ऑक्सिजनशी त्यांचा संयोग होऊन त्यापासून ढग तयार होतात ढगाच्या वर अति थंड आणि ढगाच्या खाली अति उष्ण अशा पद्धतीची हवा निर्माण होते त्यामुळे धन आणि रून प्रभार ढगात तयार होतात आणि अती उष्णता निर्माण होते त्यामुळे तेथील हवा प्रसारण पावते आणि हवेमध्ये रुन प्रभार इलेक्ट्रॉन च्या स्वरूपात तयार होउन तो वीज वाहकाकडे म्हणजे पृथ्वीकडे (झाडे,लोखंड,धातू,सजीव) यांच्यावर आकर्षित होतो यालाच वीज पडणे म्हणतात किंवा तडीताघात असेही म्हणतात.

         ढगांच्या घर्शनामुळे होणाऱ्या विद्युत पैकी 90% ही आकाशातच राहते आणि फक्त पाच ते दहा टक्के विद्युत ही जमिनीकडे आकर्षित होत त्यामध्ये खूप जास्त तीव्रता असल्याकारणाने जीवित हानी होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे यापासून खबरदारी घेऊन कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती घेऊ.

*वीज पडण्यापासून/तडीताघाता पासून कसे वाचावे:-* वीज चमकत किंवा कडाडत असताना खालील गोष्टी कराव्यात १)कोरड्या ठिकाणी गुडघे छातीला लाऊन कानावर हात ठेऊन बसावे.२)पाण्यापासून,लोखंड,पितळ,तांबे, अल्युमिनियम इत्यादी विद्युत वाहक वस्तूपासून किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूपासून दूर राहावे.३)उंच टॉवर ,उंच झाडे,उंच डोंगर,किंवा उंचावर असलेल्या ठिकाणी बसू नये.उदा मोबाईल टॉवर,खारीक,माड,ताड,सुपारी, निलगिरी वृक्षाखाली बसू नये ४)पावसात विज कडाडत असताना पतंग उडवू नये,छत्री वापरू नये,पाण्यात बसू नये ,पाण्यात पोहायला जाऊ नये ,ओल्या ठिकाणी बसू नये.५)खोल दरीत,दगडाच्या आडोश्याला,सिमेंट च्या घरात बसावे,कोरड्या ठिकाणी विद्युत बोर्ड नसलेल्या ठीकाणी बसावे.६)घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत,विद्युत पुरवठा खंडित करावा ,विद्युत उपकरना पासून दूर उभ रहावे ,मोबाईल बंद  ठेवावा ,टेलिफोन वर बोलू नये .७)निवारा शोधणे अत्यावश्यक आहे ,तो पण सिमेंट काँक्रिट घराचा ,भिंती बंद निवारा शोधून त्यात थांबावे.८)गारपीट होत असेल तरीही सिमेंट काँक्रिट घराचा निवारा घ्यावा ,वाहनांमध्ये प्रवास करताना गाडी मोकळ्या जागी थांबवावी,शांत बसावे , टू व्हीलर किंवा ट्रॅक्टर पासून दूर थांबावे .वादळ वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी घराचा आडोसा घ्यावा.९)जेंव्हा तुमच्या अंगावरील केस उभे राहतील,त्वचा हुळूहुलू लागेल अंगावर काटा येईल तेंव्हा तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते अश्या वेळी लगेच जमिनीवर आडवे व्हा,इलेक्ट्रिक वस्तू जसे हेअर ड्रायर, इस्री,मिक्सर,फ्रिज,मसाज उपकरण, सेविंग मशीन वीज चमकत असताना वापरू नका.१०)जंगलात राहणाऱ्या लोकांनी मोठ्या दगडाखाली,गुहेत,किंवा रस्त्याच्या पुलाखाली आसरा घ्यावा,अती पुर येईल आणि वाहून जाऊ यापासून खबरदारी घ्यावी,जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू होतो कारण त्यांच्याकडून खबरदारी घेतली जात नाही.अश्यावेळी आकाशात काळे ढग जमा होताना दिसले ,हवा सुटायला लागली की घर किंवा निवारा तो पण पक्का सिमेंट चे घर (पत्र्याचे शेड नव्हे ) जवळ करावे .

*वीज पडल्यास/तडीताघात झाल्यास काय करावे:-* १)किती अंग भाजले आहे ते पाहावे ,त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत २)सीपीआर म्हणजे दोन्ही हात रुग्णाच्या छातीवर ठेऊन दाब द्यावा (कृत्रिम श्वास).३) रुग्णाच्या नाकात तोंडाने हवा फुंकणे याला  कृत्रिम स्वासोच्छवास म्हणतात.४)हलक्या हाताने अंग चोळणे मालिश करणे ,हात पाय चोळणे आणि तातडीने रुग्णालयात दाखल करणे.....

*लेखन मा.सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर-९९२२५४१०३०*





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.