उदगीर बस स्थानकावर महिलांचा जल्लोष
बाबूराव बोरोळे/ उदगीर -
उदगीर--राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महिलांना एस. टी. ने प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत जाहीर केल्यामुळे येथील भाजपा महिला आघाडीच्या वतीने महिलांनी पेढे वाटून जल्लोष केला.
,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी महिलांसाठी अनेक योजनांना मंजुरी दिली, महाराष्ट्रातील महिलांसाठी, पंचामृत कलश अर्पण केले आहे,प्रामुख्याने सरसकट महिलांना बस ने प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत दिली,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, महिला मोर्च्या प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या आदेशाने,भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या वतीने,उदगीर बस स्थानकात पेढे वाटून महिलांनी जल्लोष केला. यावेळी महिला पदाधिकारी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा हिंगोली जिल्हयाचा समन्व्यक उत्तरा कलबुर्गे,
जिल्हा सरचिटणीस श्यामला कारामुंगे,उदगीर तालुका महिला मोर्च्या अध्यक्षा उषा माने,जिल्हा पदाधिकारी मंदाकिनी जीवने,रमाबाई वाघमारे,स्वाती वट्टमवार, अनिता बिरादार,शहर सरचिटणीस वर्षा धावारे,
तालुका सरचिटणीस आरती सुर्यवंशी,सुरेखा आंबेगावे, तालुका उपाध्यक्ष रंजिता सांडवे,महादेवी पाटील,उषा सुर्यवंशी ,महिला प्रवासी यांनी जल्लोष केला.
stay connected