महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ केज तालुका अध्यक्ष पदी रमेश गुळभिले यांची निवड

 महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ केज तालुका अध्यक्ष पदी रमेश गुळभिले यांची निवड



  केज दि.१९ ( रंजीत घाडगे ):-


केज तालुक्यात सर्व परिचीत असे रथ व्यापारी व दैनिक पार्श्वभूमी चे केज तालुका प्रतिनिधी  नेहमी सामाजीक क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्ती म्हणून केज तालूक्यात सर्व दुर ख्याती आहे असे रमेश गुळभिले यांची महिती अधिकार कार्यकर्ता महासंघ केज तालूका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष बसवेकर , कार्याध्यक्ष शेखर कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष अजय भांगे, उपाध्यक्ष अँड.घाईतिडक सरचिटणीस मुबशीर खतीब यांच्या बैठकीनंतर रमेश गुळभिले यांची निवड केज तालुका अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली.


निवडी नंतर रमेश गुळभिले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, माहिती अधिकार फेरडेशनची संपूर्ण नियम अटी व आचारसंहिता यांचे काटेकोर पणे पालन करीन व या पदावर जबाबदारीने काम करीन या पदाचा कुठलाही गैर वापर करणार नाही सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रमेश गुळभिले यांनी व्यक्त केले आहे.

या निवडीनंतर केज तालुक्यातील मित्र परिवारा कडून अभिनंदन केले जात आहे.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.