*माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून लातूर तालुक्यातील गारपीटग्रस्त गावांना काँग्रेस शिष्टमंडळाच्या भेटी* *नुकसानीची पहाणी करून शेतकरी वर्गाला दिलासा*

 * 


 *माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून  लातूर  तालुक्यातील  गारपीटग्रस्त गावांना  काँग्रेस शिष्टमंडळाच्या भेटी* 






*नुकसानीची पहाणी करून शेतकरी वर्गाला दिलासा* 


बाबूराव बोरोळे /उदगीर

तेजवार्ता न्युज लातूर


लातूर .१९ मार्च :

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून  लातूर  तालुक्यातील  गारपीटग्रस्त गावांना  काँग्रेस शिष्टमंडळाने भेटी  देऊन

नुकसानीची पहाणी केली शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे.


  शनिवारी दुपारी लातूर जिल्ह्यात  व तालुक्यात गारपिट होऊन हरभरा, गहू, ज्वारी ही पिके तसेच भाजीपाला व फळबागांची नासाडी झाली आहे.  याची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अडचणीत आलेल्या या शेतकरी वर्गाला मदत मिळावी म्हणून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशा सुचना लातूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून दिल्या आहेत.  


आमदार अमित देशमुख  यांच्या सूचनेवरून  लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने  रविवारी लातूर तालुक्यातील साई, महापूर व इतर गावच्या शिवारात जाऊन गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली, अपतग्रस्त शेतकऱ्यांना  धीर दिला, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून नुकसानीची भरपाई मिळवून दिली जाईल अशा शब्दात दिलासाही दिला. या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अँड, श्री किरणजी जाधव विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री रवींद्रजी काळे,  श्री महेश काळे, इतर पदाधिकारी सहभागी झाले होते या भेटी प्रसंगी साई गावचे सरपंच श्री अमोल पवार,विठ्ठल पवार, सूरज पवार, रामदास वलसे,सिदाजी पवार,महेंद्र पवार,गोविंद पवार, शंकर पवार, लक्ष्मण मुळे, केशव मुळे, सुरेश वलसे, राजाभाऊ वलसे, विजय पवार, सागर पवार, ईत्यादी उपस्थित होते


 मागच्या दोन दिवसात लातूर तालुका व जिल्ह्यात  वादळीवारे व गारपीटीसह पाऊस झाला त्यामूळे काढणीस आलेले  काढणीस आलेले गहू, हरभरा, ज्वारी, करडी व इतर रब्बी पिके, भाजीपाला, अंबा, द्राक्षे व इतर फळबागाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे.  या संदर्भाने माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अवकाळी पाऊस आणि गारपीटीमूळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सुचना दिल्या आहेत.

----






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.