*रविवारी हिवरे बाजार येथे 'बाळ अमृत' चे प्रकाशन व काव्य संमेलन*
अहमदनगर: *वाटेफळ ता. नगर येथील कवी बाळासाहेब अमृते यांच्या 'बाळ अमृत' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आदर्श गाव हिवरे बाजार येथे रविवार दिनांक १९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते होणार आहे* अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य खासेराव शितोळे,उद्योजक दिपकसेठ दरे,सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे, अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त मुकेश मुळे,ज्येष्ठ साहित्यिक मेधाताई काळे, नागेबाबा पथसंस्थेचे चेअरमन कडू भाऊ काळे,उद्योजक जालिंदर तनपुरे,पैलवान उद्धवराव अमृते, शब्दगंध चे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.शंकरराव चव्हाण,आष्टी येथील कवी डॉ.एन डी चौधरी,प्रा.पी.एम.साठे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिवरे बाजार येथील प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात होत आहे.
यावेळी होणाऱ्या काव्य संमेलनात प्रशांत वाघ,सुभाष सोनवणे, विठ्ठल सोनवणे, लक्ष्मीकांत लोणे, कवयित्री स्वाती ठुबे,अजयकुमार पवार, बबनराव गिरी, कवी गीताराम नरवडे, बाळासाहेब मुंतोडे त्यांच्यासह अनेक मान्यवर कवी उपस्थित राहून आपल्या काव्यरचना सादर करणार आहेत.
तरी या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभास व काव्य संमेलनास साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, कवयित्री शर्मिला गोसावी, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे,राजेंद्र फंड,डॉ. तुकाराम गोंदकर, सुनीलकुमार धस, शाहीर भारत गाडेकर,कृष्णा अमृते,अशोक बोरुडे,किशोर डोंगरे,राजेंद्र पवार ,रामकिसन माने व जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे यांनी केले आहे.
stay connected