*केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे मनीवाईज वित्तीय साक्षरता लिंकेज कॅम्प संपन्न..*==========================*ग्रामीण भागातील लोकांनी विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे... समन्वयक रंजीत घाडगे*
केज (प्रतिनिधी) दि.१८ रोजी केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे भारतीय रिझर्व्ह बँक तथा क्रिशील फाउंडेशन मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र वडवणी अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बॅंक केज यांच्या मार्गदर्शनाखाली चंदन सावरगाव येथे लिंकेज कॅम्प आयोजित करण्यात आला होता...
सदरील माहिती अशी की, मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली केज तालुक्यातील विविध गावांमध्ये क्रिशील फाउंडेशन यांच्या वतीने जनजागृती चे काम चालू आहे. बॅंकेच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचल्या पाहिजेत व त्याची जनजागृती झाली पाहिजे या साठी मनीवाईज चे काम चालू आहे. केज तालुका समन्वयक श्री रंजित घाडगे हे काम करत आहेत. बचत खाते उघडणे, मोबाईल लिंक करणे, विमा काढणे, अटल पेन्शन योजना, सुकन्या सम्रृद्धी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अशा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विविध योजना. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत माहिती झाली पाहिजे यासाठी व आज लिंकेज कॅम्प घेऊन लोकांचे विमा काढणे हे कार्य केले. या कार्यक्रमासाठी तालुका समन्वयक श्री रंजित घाडगे, सरपंच दळवी, सदस्य दिपक वाघमारे, बॅंक बी सी सारिका सचिन तपसे, सी आर पी, प्रेरणा तपसे, प्रकाश काळे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....
stay connected