रस्त्याचे काम व्यवस्थीत करा, नसता शिव संघर्ष ग्रुपचे मावळे काम बंद पाडतील..... सुरेश पाटोळे
पाटोदा (प्रतिनिधी)
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर गटातील अतिशय महत्वाचा आणि मुख्य असलेला दोन महामार्गांना जोडणारा वांजराफाटा-कुसळंब-पिंपळवंडी रस्ता व्यवस्थित करा, नसता अंमळनेर गटातील शिव संघर्ष ग्रुप चे मावळे निकृष्ट काम दिसल्यास बंद पाडतील अशी माहिती शिव संघर्ष ग्रुप चे नेते सुरेश पाटोळे यांनी दिली आहे.
नुकताच सुरेश पाटोळे यांनी अंमळनेर गटातील गावांचा दौरा केला आहे. यावेळी अनेक गावातील नागरिकांनी नवीन रस्ता कामाच्या बोगसगिरीबद्दल सुरेश पाटोळे यांच्या समोर पाडा वाचला तर काही पत्रकारांनी या कामाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने आणि समाजमाध्यमात हा रस्ता निकृष्ट होत असल्याचा बातम्या आलेल्या असल्याचे सांगितल्याने सुरेश पाटोळे यांनी या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांना होत असलेल्या निकृष्ट कामासंदर्भात चांगलेच फैलावर घेतले यावेळी समाजमाध्यमात बोलतांना सांगितले की जर हा रस्ता निकृष्ट व दर्जाहित झाल्यास संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांना ताकित देवून जर काम निकृष्ट झाल्यास सर्वस्वी अधिकाऱ्यांना दोषी ठरवून कारवाई करण्याची आपण शिफारस करू. अशीही माहिती सुरेश पाटोळे यांनी दिली.
stay connected