नागेबाबामध्ये अपघाती विमा काढला अन् विठ्ठलाच्या रूपात आमच्या दारात नागेबाबा आले - मयत सापतेच्या आईने व्यक्त केली प्रतिक्रीया
आष्टी(प्रतिनिधी)-धावपळीच्या या युगामध्ये जीवनाची काही खात्री राहिलेली नाही. मृत्यूचं संकट कधीही कोणावरही ओढू शकते ते आपल्या हातात नाही.अचानक आलेल्या या संकटाच्या वेळी मयताच्या घरच्या लोकांना आधार देण्याचे काम नागेबाबा मल्टिस्टेट मार्फत झालेलं आहे त्यांचे आभार मानायला शब्द अपुरे पडत आहेत त्यांच्याकडून अजून अशाच प्रकारचे समाजकार्य घडो असे प्रतिपादन ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी कडा केले.
नागेबाबा मल्टिस्टेट को.ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर च्या कडा शाखेतील खातेदार विठ्ठल गुणाजी सापते यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.त्या अपघातात त्यांचे अपघाती निधन झाले.त्यामुळे संस्थेने त्यांचा विमा कवच मधून रक्कम रुपये १० लाख रूपायांचा विमा मंजूर करत आज दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मयताच्या वारसांना घरी जाऊन या विमा योजनेचा धनादेश सुपूर्द केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पञकार गणेश दळवी हे होते.
यावेळी ह.भ.प.विष्णु महाराज आंधळे,ह.भ.प.निवृत्ती महाराज बोडखे,ह.भ.प.दादामहाराज चांगुणे,कडा गावचे सरपंच युवराज पाटील,शेरी गावचे सरपंच संदिप खकाळ, उपसरपंच दिपक सोनवणे,बाळासाहेब वाघुले,नवनाथ औंदकर,रेवननाथ राऊत,आष्टी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद ढोबळे,रघुनाथ कर्डिले,नितीन कांबळे, पञकार प्रविण पोकळे,संजय खंडागळे माजी जि. प. सदस्य सतिश झगडे, बाळासाहेब वाघुले यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना नागेबाबा मल्टीस्टेटचे फंड मॅनेजर अनिल कदम यांनी सांगीतले की, ७०-८० खातेदारांच्या वारसाला अपघाती निधन झाल्याची तर १४० खातेदारांना अपघाती उपचारासाठी विमा रक्कम वाटप केले असून आत्ता पर्यंत दोन वर्षात दोन ते अडीच कोटी रूपये विमा कवच करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगीतले.
पुढे बोलतांना ह.भ.प.बहिरवाल म्हणाले,श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्था वर्षाचे 365 दिवस ग्राहकांना सेवा देताना केवळ आर्थिक क्षेत्रात कार्य न करता आपणही समाज्याचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाने व संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत धार्मिक,शैक्षणिक,सामाजिक व सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य ही संस्था करत असून,संस्थेतील प्रत्येक सभासद हा आपला परिवारातील घटक आहे.या परिवारातील कर्जदार किंवा सभासद यांचे अपघात झाल्यास या कुटुंबावर अचानक संकट येते यामुळे कुटुंबाची वाताहत होते त्यामुळे कर्जाचा भार या कुटुंबावर वाढतो.त्यामुळे संत नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून नागेबाबा परिवारातील सभासदांसाठी नागेबाबा सुरक्षा कवच हि योजना आणली.व आज या योजनेतून आष्टी तालुक्यातील कडा शाखेतील खातेदारांना घरी येऊन या सापते कुटूंबीयांना मदत या नागेबाबा परिवाराने केली हि बाब म्हणजे नागेबाबा हा परिवार प्रत्येक कुटूंबाला आधार देण्याचे काम करत आहे.यावेळी कडा शाखेचे शाखाधिकारी नवनाथ वंजारे म्हणाले,केवळ १००० रुपये भरून अपघाती ५ लाख रु.हॉस्पिटल खर्च व १० लाख विमा असे या योजनेचे स्वरूप असल्याचेही त्यांनी सांगीतले.आज आपल्या शाखेतील खातेदाराच्या वारसाला या पाॅलिसीचा आधार झाला असल्याचेही त्यांनी सांगीतले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिजनल आॅफिसर यशवंत मिसाळ,देविदास कदम,पोपट जमधडे,कडा शाखेचे नवनाथ वंजारे,आष्टी शाखेचे संदिप टेकाडे यांच्यासह कडा शाखेतील सर्व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.
—————
विठ्ठलाच्या रूपात नागेबाबा...
—————————————
आमचा मुलगा आषाढी वारीला दरवर्षी पंढरपूरला जातात या वर्षीही ते वारीला जात होते.पण दुर्देवाने त्यांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला.पण घरची परिस्थितीचा विचार करत त्यांनी नागेबाबामध्ये अपघाती विमा काढला अन् आज विठ्ठलाच्या रूपात आमच्या दारात नागेबाबा आले असल्याची मयत च्या आईने प्रतिक्रीया कुटूंबीयांनी दिली.
——————————————————
रूण्नांनाही आधार
—————————
अहमदनगर शहरात खाजगी,सरकारी कोणत्याही हाॅस्पीटलमध्ये नागेबाबा संस्थेचा खातेदार यांचा नातेवाईक उपचार घेत असेल तर त्या रूग्णांना व रूग्णांबरोबर एक असे एकूण दोन लोकांना दररोज विनामुल्य जेवण एकदम वेळेवर पोहच करत असून,हा अन्नपुर्ण उपक्रम गेल्या तीन वर्षापासून नियमीत सुरू असून,दररोज शेकडो रूग्ण या योजनेचा लाभ घेतात असे रिजनल आॅफीसर यशवंत मिसाळ यांनी सांगीतले.
—————————————————————
stay connected