कविताशी नाळ शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे कमळवेल्ली, यवतमाळ

 कविताशी नाळ
शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
 कमळवेल्ली, यवतमाळ




जीवनाच्या काही प्रसंगाने

रडता रडता हसवणं शिकविलं

काही क्षणभराच्या आनंदाने

हसता हसता रडवणं शिकविलं


हसत्या रडवत्या जीवनाने

मला परिस्थितीशी लढायला शिकविलं

लढता लढता स्वआसवाने

या दुनियात जगायला शिकविलं


स्नेही प्रेमी स्वभावाने

ह्रदयात घर करायला शिकविलं

आपल्या पवित्र आचरणाने

मनपटलावर प्रतिमा कोरायला शिकविलं


कितीही आपुलकीने जपल्याने

कुणीच कुणाचं नसल्याचं शिकविलं

स्वत:च स्वत:वरच्या विश्वासाने

जीवनाची नाव हाकण्याचं शिकविलं


शब्द शब्दाच्या गुंफनाने

कविताशी नाळ जोडायला शिकविलं

कविताच्या सुमधूर सहवासाने

अनेकाअनेक धडे गिरवायला शिकविलं


आई-वडिलांच्या संस्काराने 

जगी नाव कमवायला शिकविलं

म्हणूनच सुनीलच्या लेखनीने

साहित्यक्षेत्रात ठसा उमटवायला शिकविलं



शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे

 कमळवेल्ली, यवतमाळ

भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.