*ढाकेफळ येथे त्यागमुर्ती माता रमाई यांची १२५ वी जयंती साजरी....*
===========================
केज (प्रतिनिधी) दि. ७ रोजी ढाकेफळ येथे त्यागमुर्ती माता रमाई यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...
सदरील माहिती अशी की, सन ७ फेब्रुवारी १८९८ रोजी मात रमाई यांचा जन्म झाला व सर्व दिन दलीत वंचित व उपेक्षित यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या माठीमागे खंबीर उभ्या राहिल्या त्या म्हणजे माता रमाई होय.आज त्यांची १२५ वी जयंती ढाकेफळ येथे सर्व बौद्ध उपासक व उपासीका उपस्थित होते. सर्व प्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्रिशरण पंचशील घेऊन त्यांना वंदन करण्यात आले. या वेळी बौध्दाचार्य अरुण पटेकर, पत्रकार रंजीत घाडगे, भाऊसाहेब घाडगे, ईश्वर घाडगे, भानूदास घाडगे, रविन्द घाडगे,किरण घाडगे, अर्जुन घाडगे, तसेच महिला उपासीका पुजा घाडगे,छायाताई घाडगे, गोदावरी घाडगे, शुकेशनी घाडगे तसेच बालक तथा बालीका उपस्थित होते......
stay connected